महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ghoomer: 'मेलबॉर्न फिल्म फेस्टिव्हल'मध्ये होणार 'घुमर'चा प्रीमियर, मोशन पोस्टर रिलीज - Melbourne Film Festival

अभिषेक बच्चन आणि सयामी खेर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'घुमर' चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. या चित्रपटाने यंदाच्या 'मेलबॉर्न फिल्म फेस्टिव्हल'ची सुरूवात होणार आहे. आर बाल्की दिग्दर्शित या चित्रपटाला मिळालेला सन्मान कलाकार आणि क्रूसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.

Ghoomer
मेलबोर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार 'घुमर'चा प्रीमियर

By

Published : Jul 31, 2023, 1:36 PM IST

Updated : Jul 31, 2023, 2:17 PM IST

मुंबई - 'घुमर' चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोमवारी अभिषेक बच्चन आणि सयामी खेर यांच्या चित्रपटाचे मोशन पोस्ट रिलीज केले आहे. अभिषेक बच्चनने हे मोशन पोस्टर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत लिहिले, 'लेफ्टी है? लेफ्ट ही है. 'घुमर' हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी सिनेमागृहात दाखल होणार आहे.'

'घुमर' हा चित्रपटा एक हात नसलेल्या खेळाडूवर आधारित आहे. चित्रपटात ही भूमिका सयामी खेर साकारणार आहे तर तिच्या कोचच्या भूमिकेत अभिषेक बच्चन आहे. आर बल्की यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १८ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे. 'घुमर' चित्रपटात अंगद बेदी आणि शबाना आझमी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

'लॉजिकली एक हात से देश के लिए कोई खेल सकता है. नो, लेकिन ये लाईफ ना लॉजिक का खेल नहीं है, मॅजिक का खेल है. मॅजिक...' मोशन पोस्टरची सुरुवात या व्हाईस ओव्हरने होते. त्यानंतर डाव्या हातात क्रिकेटचा बॉल पकडलेली सयामी खेर आपल्या फिरकीची कमाल दाखवत अचूक मारा स्टंपवर करताना दिसते. सोशल मीडिया युजर्सना हा व्हिडिओ खूप आवडल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांवरुन दिसत आहे. लाल ह्रदय आणि फायर इमोशन्स दाखवणाऱ्या इमोजीसचा वर्षाव कमेंट सेक्शनमध्ये सुरू झाला आहे. 'घुमर' चित्रपटाचा 'प्रीमियर मेलबॉर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२३' मध्ये होणार आहे. हा चित्रपट १२ ऑगस्ट रोजी होइट्स, डॉकलँड्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

या फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर करण्यासाठी उत्सुक असलेल्या आर बाल्की आणि अभिषेक बच्चन यांनी एका संयुक्त निवेदनात म्हटलंय की, 'मेलबॉर्न इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२३' ची सुरुवात 'घुमर' चित्रपटाने होत आहे, ही आमच्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. 'घुमर'ची कथा ही प्रतिकूल परिस्थितीचे संधीमध्ये कसे रुपांतर करता येऊ शकते हे सांगणारी आहे. खेळाला अभिवादन करत मानवी लवचिकतेचे दर्शन यातून घडते. जागतिक खेळाची राजधानी असलेल्या ऑस्ट्रेलियात हा चित्रपट लॉन्च होत आहे. 'घुमर' च्या प्रीमियरसाठी सर्वांचे स्वागत आहे.'

याबद्दल बोलताना सयामी खेर म्हणाली, 'घुमर' हा चित्रपट 'मेलबॉर्न फिल्म फेस्टिव्हल'चा ओपनिंग चित्रपट आहे, हे माझ्यासाठी खूप रोमांचक आणि सन्मानाचे आहे. हा चित्रपट माझ्या ह्रदयाच्या खूप जवळचा आहे. मी अभिनयाला सुरुवात केली, तेव्हापासून पडद्यावर खेळाडू म्हणून काम करणे हे माझे स्वप्न होते. हे स्वप्न अखेरीस सत्यात उतरत आहे. ही एक प्रतिकूल परिस्थितीशी सामना करणारी विजयाची गोष्ट आहे. भावनिक आणि शारीरिकदृष्या हा माझ्यासाठी महत्त्वाचा चित्रपट आहे. मेलबॉर्न फिल्म फेस्टिव्हल'मध्ये लोक पहिल्यांदा हा चित्रपट पाहणार आहेत, हे माझ्यासाठी खूप खास आहे. शेन वॉर्नच्या भूमीवर हा चित्रपट दाखवला जात आहे याहून अधिक चांगली काही गोष्ट असून शकत नाही.

हेही वाचा -

१. Zinda Banda Song : 'जवान'मधील 'जिंदा बंदा' गाणे प्रदर्शित, भव्य सेटवर शाहरुख खानचा जबरा डान्स

२.Kiara Advani Birthday : कियारा अडवाणी पती सिद्धार्थसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली परदेशी...

३.Box Office Collection : 'ओपनहाइमर' 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ला मागे टाकत 'बार्बी' चित्रपटाने रोवला यशाचा झेंडा...

Last Updated : Jul 31, 2023, 2:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details