मुंबई- राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या आगामी त्याच्या ''घर- बंदूक- बिरयानी'' चित्रपटाचे शुटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटाचा टिझर यापूर्वी प्रसिध्द झाल्यापासून चित्रपटाबद्दलचीउत्सुकता वाढली होती. नागराजने फेसबुक लाईव्ह करत आपल्या सर्व कलाकारांची मुलाखत घेतली व चाहत्यांशी संवाद साधला.
त्याच्या 'आटपाट' प्रॉडक्शनच्या नव्या सिनेमाची घोषणा काही दिवसापूर्वी झाली होती. ''घर- बंदूक- बिरयानी'' असे शीर्षक असलेल्या या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. विशेष म्हणजे या चित्रपटात स्वतः नागराज भूमिका करणार असून 'सैराट' फेम आकाश ठोसर आणि प्रसिध्द अभिनेता सयाजी शिंदे यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत.
शुटिंगच्या शेवटच्या दिवशी सर्व कलाकारांसोबत नागराज स्वतः चाहत्यांशी बोलत होता. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्याने दिली. सयाजी शिंदे, आकाश ठोसर यांनी चित्रपट कधी एकदा तयार होतोय याची उत्कंठा व्यक्त केली. कलाकरासोबतच या लाईव्हमध्ये सर्व तंत्रज्ञ उपस्थित होते. हा जबरदस्त चित्रपट असल्याचे सर्वांनीच सांगितले.