मुंबई: 'बिग बॉस 7' ची विजेती अभिनेत्री गौहर खानने छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाची चाहत्यांचे मने जिंकली आहे. गेल्या काही दिवसांपासून गौहर खान ही तिच्या प्रेग्नसीमुळे चर्चेत होती. काही दिवसांपुर्वी गौहरचे बेबी शॉवरचे फोटो हे सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. आता तिने तिच्या अधिकृत इस्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांबरोबर गोड बातमी शेअर केली आहे. गौहरने आई झाल्याची माहिती दिली आहे.
गौहर खानकडे नव्या पाहुण्याचे आगमन :तिने नवजात बाळासोबतचा तिचा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये नवजात बाळाचा चेहरा दिसत नाही आहे. पण गौहर बाळाला कुशीत पकडून घेतले असे या फोटोमध्ये दिसून येते आहे. इस्टाग्राम पोस्टमध्ये आपला आनंद व्यक्त केला आहे. तिने पोस्टमध्ये लिहले, 'माझ्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या सर्व मातांसाठी मी दरवर्षी एक पोस्ट लिहिते, पण माझ्यासाठी 2023 मदर्स डे हा पार खास बनला आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे माझ्या आईने मला मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या बेटा!!!! गौहरने पुढे लिहिले, माझ्याकडे, माझ्या पहिल्या पोस्टसाठी ग्लॅमरसपणे तयार होऊन पोस्ट करण्याइतकी उर्जा नव्हती. मी एक आई . माझ्या बाळाला धरून ठेवणे ही अल्लाहकडून माझी सर्वोत्तम भेट आहे! पोस्टमध्ये तिने 'अल्लाहुम्मा बारिक फिही असेही लिहले. त्यानंतर तिने हॅपी मदरस् डे विश केले. गौहरला या पोस्टवर फार कमेंट आल्या आहे अनेकांनी तिला आई झाल्याबद्दल तिचे अभिनंदन केले आहे.