मुंबई - Gippy Grewal : . बिश्नोईनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. कॅनडातील व्हँकुव्हर येथील व्हाईट रॉक भागात पंजाबी गायक गिप्पी ग्रेवालच्या बंगल्यावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत धमकी दिली आहे. त्यानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुपरस्टार सलमान खान आणि सिद्धू मूसवाला यांचाही नावाचा उल्लेख केला आहे. मात्र, सध्या गायक गिप्पी ग्रेवालकडून गोळीबाराबाबत कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही. गिप्पी ग्रेवाल हा पंजाबी गायक आणि अभिनेता आहे. तो मूळचा मोहालीचा आहे. यापूर्वीही गिप्पीला गुंडांकडून धमक्या आल्या होत्या, त्यानंतर त्याची सुरक्षा वाढविण्यात आली. गिप्पी ग्रेवाल सध्या कॅनडामध्ये आहे.
सलमान खानलाच्या नावाचा उल्लेख बिश्नोईनं केला : लॉरेन्स बिश्नोईनं फेसबुक पोस्टमध्ये लिहलं, 'हो सत् श्री अकाल राम राम सबनू, आज लॉरेन्स बिश्नोई ग्रुपनं व्हँकुव्हर व्हाइट रॉक भागात गिप्पी ग्रेवाल यांच्या बंगल्यावर गोळीबार केला आहे. तू सलमान खानचा भाई आहेस ना ? त्याला सांग आता तुला वाचव. सलमान खानला हा एक संदेश नक्की दे. दाऊद तुला मदत करेल असा तुझा भ्रम आहे. पण तुला आमच्यापासून कोणी वाचवू शकणार नाही. तू सिद्धू मूसवालाच्या मृत्यूवर खूप जास्त ओव्हरअॅक्ट केला आहे. तो किती अहंकारी व्यक्ती होता? तो कोणत्या गुन्हेगारी लोकांच्या संपर्कात होता हे तुम्हाला माहीत आहे. जोपर्यंत विकी मिड्डूखेडा जिवंत होता, तोपर्यंत तू मागे-पुढे फिरायचा. तुला सिद्धूचं खूप जास्त वाईट वाटल ना. तू आता रडारवर आला आहे. आता तुला कळेल धक्का बसणे कशाला म्हणतात. तू हा ट्रेलर पाहिला आहे/ चित्रपट अजून रिलीज व्हायचा आहे, तयार राहा'. पुढं त्यानं लिहलं, कोणत्याही देशात राहा. मृत्यूपासून पळून जाऊ शकत नाही. देव तुला आशीर्वाद देईल.'