मुंबई- दिग्दर्शक मनोज शर्मा यांचा ‘शर्माजी की लग गयी’ हा निखळ विनोदी चित्रपट तिकीटबारीवर चांगला चालला होता. त्यांना स्वतःला कॉमेडी जॉनर खूप आवडतो म्हणूनच त्यांचा आगामी ‘देहाती डिस्को’ हा चित्रपट नृत्यप्रणीत असला तरी त्यांनी त्यात विनोदाची उत्तम पखरण केली आहे. या चित्रपटात ‘विदेशी ते चांगले’ ही वृत्ती खोडून काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. आपल्या देशाच्या नृत्याला प्राधान्य देत यात पाश्चिमात्य नृत्य बेमालूमपणे फिट केले आहे. यात प्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य महत्वपूर्ण भूमिकेत असून नृत्यपारंगत सक्षम शर्मा आणि साहिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांचा अल्बम प्रदर्शित झाला ज्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
लेखक-दिग्दर्शक मनोज शर्मा म्हणाले की, “देहाती डिस्को हा एक व्यावसायिक सिनेमा आहे, त्यात संगीत आणि नृत्यासोबतच जबरदस्त ॲक्शन सुद्धा आहे. गणेश आचार्य आमच्या देसी नृत्याचे प्रतिनिधित्व करत असून या चित्रपटातही आपल्या देसी शैलीतील नृत्याने लोकांना वेड लावणार आहे. देशी नृत्याचा बादशाह गणेश आचार्य ने अभिनयातही कमाल केली आहे. या चित्रपटातील प्रमुख पात्रे भोला आणि भीमा प्रेक्षकांना भावूक तर करतीलच परंतु त्यांना हसवतीलही. गणेशजी व्यतिरिक्त सक्षम शर्मा आणि साहिल हे उत्कृष्ट डान्सर आहेत, त्यांचे कॉम्बिनेशन चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ‘देहाती डिस्को’ हा चित्रपट नृत्य, संगीत, ॲक्शन, कॉमेडी आणि भावभावना यांचा अप्रतिम संगम आहे,”
सक्षम शर्माने म्हणाला की, “चित्रपटाच्या शूटिंगचा भाग होण्याची ही माझ्यासाठी पहिलीच वेळ होती. गणेश मास्टर जी, दिग्दर्शक मनोज शर्मा आणि साहिल भय्या यांच्यासोबत काम करताना मला खूप मजा आली. या चित्रपटासाठी आम्ही २ महिने प्रशिक्षण घेतले होते. ‘देहाती डिस्को’ हे संपूर्ण कुटुंबासाठी मनोरंजनाचे संपूर्ण पॅकेज आहे.”