महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

गांधी गोडसे एक युद्ध चित्रपटाचा ट्रेलर रिलिज, पठाणशी होणार बॉक्स ऑफिसवर टक्कर - चिन्मय मांडलेकरचा जबरदस्त अभिनय

राजकुमार संतोषी दिग्दर्शित गांधी गोडसे एक युद्ध या चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलिज झाला आहे. या चित्रपटातून गांधी विरुध्द गोडसे यांची वैचारिक लढाई दाखवण्यात आली असून नथुराम गोडसेची भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरचा जबरदस्त अभिनय यात पाहायला मिळत आहे. तर दीपक अंतानी यांनी महात्मा गांधींच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे.

गांधी-गोडसे एक युद्ध
गांधी-गोडसे एक युद्ध

By

Published : Jan 11, 2023, 2:21 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार संतोषी एक दशकानंतर पुन्हा नव्या चित्रपटासह सज्ज झाले आहेत. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटातून गांधी विरुध्द गोडसे यांची वैचारिक लढाई दाखवण्यात आली असून याचा बहुप्रतीक्षित ट्रेलर रिलिज झाला आहे.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारत आणि पकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर ट्रेलरची सुरूवात होते. या फाळणीत झालेली हिंसा क्रूर होती आणि याला जबाबदार गांधी होते असा युक्तीवाद सुरुवातीला संवादातून दिसून येतो. महात्मा गांधी यांना रोखणे कठीण आहे यावर उपाय काढण्यासाठी गोडसे पुढे येतो. देशभर धर्मिक दंगलीची पार्श्वभूमी असते, ती शांत करण्यासाठी गांधी जनतेते उतरतात. या दंगली जर माझ्या मृत्यूने थांबणार असतील तर त्यासाठी तयार असल्याचे गांधी म्हणतात. इकडे गोडसे गांधीला आता मरावे लागले असे म्हणत त्यांच्यावर गोळी झाडतो. गोडसेला अटक होते. मात्र यातून गांधी वाचले असल्याचे घोषणा नेहरु करतात आणि गोडसेची झोप उडते. गांधी गोडसेला भेटायची इच्छा व्यक्त करतात आणि जेलमध्ये त्याला भेटायला येतात. यावेळी गांधी आणि गोडसे यांच्यात होणारे संवाद दोघांची वैचारिक बाजू मांडणारे आहेत.

या चित्रपटातील नथुराम गोडसेची भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरचा जबरदस्त अभिनय यात पाहायला मिळत आहे. तर दीपक अंतानी यांनी महात्मा गांधींच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे.

विशेष म्हणजे ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाची रिलीज तारीख २६ जानेवारी २०२३ जाहीर करण्यात आली आहे. नेमके याच वेळी पठाण हा शाहरुख खानचा चित्रपट रिलीज होत आहे. पठाणमधून शाहरुख चार वर्षानंतर पुनरागमन करतोय तर त्याची टक्कर राजकुमार संतोषीच्या ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटासोबत होणार आहे. सध्या पठाण या चित्रपटाची खूप चर्चा आहे. या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणीही समाजातील एक गट करत आहे. हाच गट ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाला पाठींबा देऊ शकतो. त्यामुळे दोन्ही चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर होऊ शकते.

एकापाठोपाठ एक सिनेमे पडल्यावर शाहरुख खानने (Shah Rukh Khan) अभिनयातून ब्रेक घेतला होता. आता शाहरुख खान तब्बल चार वर्षांच्या गॅपनंतर 'पठाण' (Pathan Movie) मधून मोठ्या पडद्यावर प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे. हा एक थक्क करायला लावणाऱ्या अ‍ॅक्शनने परिपूर्ण असा चित्रपट असून त्यात दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आतापर्यंत कधीही न दिसलेल्या रूपात दिसणार आहे, तर शाहरुख जॉन अब्राहमच्या विरोधात उभा ठाकलेला दिसणार असून चांगल्या आणि वाईटाचा थरारक संघर्ष यातून दिसेल.

पठाण चित्रपटाचे पहिले गाणे बेशरम रंग प्रदर्शित झाल्यानंतर यातील दीपिका पदुकोणच्या बिकनीच्या रंगावरुन मोठा वाद निर्माण झाला. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पठाणची टक्कर ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटासोबत झाली तर यश कोणाच्या पदरात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details