महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ganapath : माजी क्रिकेटर इरफान पठाण आणि श्रीसंतसोबत 'हे' कलाकार थिरकले स्टार स्पोर्ट्स स्टुडिओत... - माजी क्रिकेटर श्रीसंत

Ganapath : टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन 'गणपत' चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. दरम्यान आता 'गणपत' चित्रपटाची टिम ही स्टार स्पोर्ट्स स्टुडिओत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. यावेळी त्याच्यासोबत माजी क्रिकेटर इरफान पठाण आणि श्रीसंत होते.

Ganapath
गणपत

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 6:49 PM IST

मुंबई - Ganapath :टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन स्टारर 'गणपत' चित्रपट रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच निर्मात्यांनी चित्रपटातील 'हम आये हैं' हे रिलीज केले होते. हे गाणे सोशल मीडियावरही खूप ट्रेंड करत होते. या गाण्यावर अनेकजण रील्सही तयार करून सोशल मीडियावर शेअर करत होते. हे गाणं चाहत्यांना खूप पसंत पडलं आहे. दरम्यान या आता या गाण्यावरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचा माजी क्रिकेटर इरफान पठाण आणि श्रीसंत आहेत. याशिवाय व्हिडिओमध्ये क्रिती सेनॉन, टायगर श्रॉफ देखील आहेत. या व्हिडिओमध्ये हे स्टार्स मुलांसोबत स्टेजवर डान्स करताना दिसत आहेत.

'गणपत'चं प्रमोशन : 'गणपत' चित्रपटाची टीम ही स्टार स्पोर्ट्स स्टुडिओत त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. यावेळी तिथे इरफान पठाण आणि श्रीसंत देखील होते. आता या चौघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप झपाट्यानं व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये गणपत टीम ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताच्या पहिल्या विश्वचषक सामन्यासाठी स्टार स्पोर्ट्स स्टुडिओमध्ये इरफान पठाण आणि छोट्या मुलांसह डान्स करताना दिसले आहेत. तसेच व्हिडिओमध्ये श्रीसंतही दिसत आहे. याशिवाय इरफान पठाण आणि श्रीसंत हे 'हम आये हैं' गाण्यावर क्रिती-टायगरसोबत हुक स्टेप करताना दिसत आहेत.

'गणपत' चित्रपटाबद्दल :'गणपत- अ हिरो इज बॉर्न' चित्रपटाचं दिग्दर्शन हे विकास बहल यांनी केले आहे. हा चित्रपट वाशू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख निर्मित आहे. 'गणपत- अ हिरो इज बॉर्न'. या चित्रपटात टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉनसोबत अमिताभ बच्चन आणि एली अवराम देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 20 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये टायगर श्रॉफची अ‍ॅक्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनॉन हे दुसऱ्यादां एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी त्यांनी 2014मध्ये हिरोपंती चित्रपटामध्ये एकत्र दिसले होते. हा चित्रपट देखील प्रेक्षकांना पसंत पडला होता.

हेही वाचा :

  1. Actress Nushrratt Bharuccha : अभिनेत्री नुसरत भरुचा सुखरूप पोहचली मायदेशी; इस्रायलमध्ये अडकली होती
  2. Taapsee Pannu Angry On Paps: बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू चिडली पापाराझीवर ; पहा व्हिडिओ...
  3. Tejas Trailer is out : कंगना राणौत स्टारर 'तेजस'चा ट्रेलर झाला प्रदर्शित ; पहा...

ABOUT THE AUTHOR

...view details