महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Gadar 2 vs OMG 2 box office day 19: बॉक्स ऑफिसवर 'गदर 2' करत आहे राज्य... - बॉक्स ऑफिस

सनी देओलचा 'गदर 2' हा चित्रपट येत्या काही दिवसांत 500 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. हा चित्रपट खूप झपाट्याने बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. याउलट, 'ओ माय गॉड 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर 150 कोटी कमाईसाठी संघर्ष करत आहे.

Gadar 2 vs OMG 2 box office day 19
गदर 2 आणि ओ माय गॉड 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2023, 6:43 PM IST

मुंबई : बॉलिवूडचा दमदार अभिनेता सनी देओलचा चित्रपट 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. अवघ्या 80 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 450 कोटींचा आकडा पार केला आहे. 'गदर 2' अजूनही सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. थिएटरमध्ये 'हिंदुस्तान झिंदाबाद'चा नारा अनेकजण देत आहेत. 'गदर 2' हा चित्रपट लवकरच 500 कोटीचे लक्ष्य गाठेल असे सध्या दिसत आहे. दरम्यान 'ओ माय गॉड 2' हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर साधारण कमाई करत आहे. या चित्रपटाला 'गदर 2'सोबत खूप संघर्ष करावा लागला आहे. 'गदर 2' आणि 'ओ माय गॉड 2' चित्रपट १९व्या दिवशी किती कमाई करू शकेल हे जाणून घेऊया...

'गदर 2'चे कलेक्शन :सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार , 'गदर 2' चित्रपटाने पहिल्या दिवशी 40.01 दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी, तिसऱ्या दिवशी 51.07 कोटी, चौथ्या दिवशी 38.07 कोटी, पाचव्या दिवशी 55. 04 कोटी, सहाव्या दिवशी 32.37 कोटी, सातव्या दिवशी 23.28 कोटी, आठव्या दिवशी 20.5 कोटी, नव्या दिवशी 31.07 कोटी, दहाव्या दिवशी 38.9 कोटी, अकराव्या दिवशी 13.5 कोटी, बाराव्या दिवशी 12.1 कोटी, तेराव्या दिवशी 10 कोटी, चौदाव्या दिवशी 8.4 कोटी, पंधराव्या दिवशी 7.1 कोटी, सोळाव्या दिवशी 13.75 कोटी, सतराव्या दिवशी 16.1 अठराव्या दिवशी 4.60 कोटींची कमाई केली. त्यानंतर हा चित्रपट एकोणीसव्या दिवशी 4.70 कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 465.35 होईल.

'ओ माय गॉड 2' चे कलेक्शन : अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी स्टारर 'ओ माय गॉड 2'ने तिसर्‍या सोमवारी म्हणजेच रिलीजच्‍या 18 व्‍या दिवशी 1.20 कोटींची कमाई केली आहे. यासह या चित्रपाटचे एकूण कलेक्शन 137.12 कोटीवर पोहचले आहे. 'ओ माय गॉड 2' हा चित्रपट एकोणीसव्या दिवशी 1.50 कोटी कमाई करू शकेल. त्यानंतर या चित्रपटाने एकूण कलेक्शन 138.43 इतके होईल. 'ड्रीम गर्ल 2' आणि 'गदर 2'मुळे 'ओ माय गॉड 2'च्या कमाईवर परिणाम झाला आहे. हे तिन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई करतात हे पाहणे लक्षणीय ठरणार आहेत.

हेही वाचा :

  1. Dream Girl 2 box office collection day 5: 'ड्रीम गर्ल 2' रिलीजच्या पाचव्या दिवशी करेल 'इतकी' कमाई....
  2. Jawan Movie : 'जवान' चित्रपटाबद्दल शाहरुखच्या फॅन क्लबने केला खुलासा...
  3. Rani Mukerji wedding pictures : आदित्य चोप्राशी दशकभरापूर्वी झालेल्या लग्नाचे फोटो शेअर करणार राणी मुखर्जी

ABOUT THE AUTHOR

...view details