महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Gadar २ vs OMG २ box office collection day १७ : 'गदर 2' बाहुबलीचा रेकॉर्ड मोडणार? जाणून घ्या कमाईची आकडेवारी - Gadar 2 vs OMG 2 box office collection

सनी देओलचा 'गदर 2' 17व्या दिवशीही जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटाने 450 कोटींहून अधिक कमाई केली आहे. दुसरीकडे,'ओएमजी 2'च्या कमाईत किरकोळ वाढ झाली आहे. हा चित्रपट 150 कोटींच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Gadar 2
गदर 2

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 10:26 AM IST

Updated : Aug 28, 2023, 10:58 AM IST

मुंबई : सनी देओलचा 'गदर 2' आणि अक्षय कुमारचा 'ओएमजी 2' सातत्याने विक्रम करत आहेत. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर 2' लवकरच 500 कोटीच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या मार्गावर आहे. आयुष्मान खुराना स्टारर चित्रपट 'ड्रीम गर्ल 2' देखील या शुक्रवारी म्हणजेच 25 ऑगस्ट रोजी रूपेरी पडद्यावर रिलीज झाला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 'गदर 2' रिलीजच्या 17व्या दिवशी देखील आपली जादू कामय ठेवत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 'गदर 2' आणि 'ओएमजी 2'ने रिलीजच्या 17व्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला हे जाणून घेऊया...

'गदर 2' ची 17व्या दिवशीची कमाई : 'गदर 2' पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर पकड ठेवून आहे. चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांच्या डोक्यावर चढली आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊन 17 दिवस झाल्यानंतरही चांगलाच धुमाकूळ घालत आहे. एका रिपोर्टनुसार, तिसर्‍या वीकेंडलाही शनिवारी या चित्रपटाने रूपेरी पडद्यावर 13.75 कोटींचा व्यवसाय केला होता. याशिवाय या चित्रपटाने रविवारी 17व्या दिवशी 17 कोटी कमाविले आहेत. यासह, 'गदर 2'ची 17 दिवसांची एकूण कमाई आता 461.95 कोटी रुपयांवर गेली आहे. हा चित्रपट जर असाच कमाई करत राहिला तर लवकरच 500 कोटीचा आकडा पार करेल.

'ओएमजी 2' बॉक्स आफिस कलेक्शन :अक्षय कुमार स्टारर चित्रपट 'ओएमजी 2' ला पहिल्या दिवसापासून सनी देओलच्या 'गदर 2' सोबत संघर्ष करावा लागला आहे. मात्र, सामाजिक विषयावर बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगला व्यवसाय केला आहे. तिसर्‍या आठवड्यात चित्रपटाच्या कमाईत बऱ्यापैकी घट झाली होती, पण पुन्हा एकदा वीकेंडला 'ओएमजी 2 'च्या कलेक्शनमध्ये थोडीशी उसळी पाहायला मिळाली. 'ओएमजी 2' ने तिसर्‍या शनिवारी 3.15 कोटी कलेक्शन केले होते, दरम्यान आता या चित्रपटाने रिलीजच्या 17 व्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या रविवारी 3.65 कोटी कमावले आहेत. यासह 'ओएमजी 2'ची 17व्या दिवसांची एकूण कमाई आता 135.02 कोटी रुपयांवर गेली आहे.

हेही वाचा :

  1. Yash And Radhika pandit : साऊथ स्टार यशची पत्नी राधिका पंडितने मुलांसह 'वरमहालक्ष्मी'चा उत्सव केला साजरा....
  2. Kangana Ranaut on ISRO : 'इस्रो'मधील महिला शास्त्रज्ञांचं कंगना रणौतनं केलं कौतुक...
  3. Jawan Advance Booking : शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाले सुरू...
Last Updated : Aug 28, 2023, 10:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details