मुंबई :सनी देओल स्टारर 'गदर २' आणि अक्षय कुमारचा 'ओ माय गॉड २' या वर्षातील सर्वाधिक मोठे चित्रपट आहेत. हे दोन्ही चित्रपट ११ ऑगस्ट रोजी एकत्र प्रदर्शित झाले. रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून 'गदर २' बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड बनवत असताना, सनी देओलच्या चित्रपटासमोर 'ओ माय गॉड २' खूप कमी कमाई करत आहे. 'गदर २' हा भारतातच नाही तर परदेशात खूप कमाई करत आहे. 'गदर २'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तारा आणि सकिनाची ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहणे लोकांना एखाद्या मेजवानीसारखे आहे. त्याचबरोबर 'ओ माय गॉड २' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर हळूहळू कमाई करत आहे. दरम्यान आता या चित्रपटांनी रिलीजच्या आठव्या दिवशी किती कोटींचा व्यवसाय केला हे जाणून घेऊया...
'गदर २'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ८ : सनी देओलचा 'गदर २' दररोज नवे रेकॉर्ड करत आहे आणि आतापर्यंत या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. 'गदर २' २००१ मध्ये आलेल्या 'गदर एक प्रेम कथा'चा सीक्वल आहे. 'गदर २' च्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने २८४.६३ कोटींचे कलेक्शन केले आहे. याशिवाय या चित्रपटाने रिलीजच्या आठव्या दिवशी किती कमाई केली याचे आकडे आता समोर आले आहेत. सकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्टनुसार 'गदर २'च्या कमाईत आठव्या दिवशी १६.२४ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. 'गदर २'ने १९.५ कोटींचा गल्ला जमवला आहे. यासह, 'गदर २' ची ८ दिवसांची एकूण कमाई आता ३०४.१३ कोटी रुपयांवर गेली आहे. अनिल शर्मा दिग्दर्शित 'गदर २'ने 'पठाण', 'दंगल', 'केजीएफ २', 'पीके' आणि 'द काश्मीर फाइल्स' यांना मागे टाकले आहेत.