मुंबई - Gadar 2 VS OMG 2 box office day 24 :सनी देओलचा 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण केले आहे. गेले काही महिने बॉलिवूडसाठी खूप चांगले गेले आहेत. जवळपास सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. आता सप्टेंबरमध्ये अनेक मोठे चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. 'जवान' रिलीज होण्यापूर्वी 'गदर-2' आणि 'ओएमजी 2'च्या व्यवसायवर परिणाम होत आहे. 'गदर-2'ने चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. चला तर जाणून घेऊया 'गदर-2' आणि 'ओएमजी 2'ने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली तर...
'गदर 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 24:'गदर-2'ने रिलीजच्या 23व्या 5.72ची कमाई केली आहे. त्यानंतर आज हा चित्रपट म्हणजेच रविवारी 7.50 कोटी कमाई करू शकेल असा अंदाज बांधला जात आहे. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 500.87 होईल. 'गदर-2' हा देशांतर्गत आज 500 कोटीचा टप्पा ओलांडेल असे सध्या दिसत आहे. या चित्रपटाने तीन आठवड्यात 490 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तारा सिंग आणि सकिना जोडी प्रेक्षकांना खूप आवडली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आता देखील खूप गर्दी चित्रपटगृहांमध्ये होत आहे.