मुंबई :सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर २' हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'गदर २' चित्रपटाची वाट प्रेक्षक खूप आतुरतेने पाहत आहे. दरम्यान, आता या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाले आहे. गदर २ चित्रपटाचा ट्रेलर हा सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत आहे. ट्रेलर लाँचच्या निमित्ताने, २२ वर्षांनंतरही, सनी आणि अमिषा पटेलची सुंदर केमिस्ट्री आप पाहू शकतो. सनी आणि अमिषाचा सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर शेअर केले व्हिडिओ : पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अमीषा पटेल पुन्हा एकदा सुंदर लाल शरारात सकीनाच्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तर सनी देओल तारा सिंगच्या लूकमध्ये हँडसम दिसत आहे. तर दुसरीकडे ढोल-ताशांच्या गजरात ट्रेलर लॉन्चमध्ये दाखल झालेल्या या दोघांनाही चाहत्यांचे प्रेम मिळत आहे. याशिवाय दुसऱ्या व्हिडिओमध्ये सकीना आणि तारा सिंगची केमिस्ट्री पाहून चाहत्यांनी दोघांचे कौतुक केले आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्याशिवाय उत्कर्ष शर्मा पुन्हा एकदा 'गदर २' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात सिमरत कौर, मनीष वाधवा आणि लव सिन्हा हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
ट्रेलर पाहून तुम्हाला धक्का बसेल :'गदर २'च्या धमाकेदार ट्रेलरची सुरुवात एका संवादाने होते. यानंतर ट्रेलरमध्ये तारा आणि सकिना यांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळते, याशिवाय नंतर ट्रेलरमध्ये अॅक्शन सीन्स देखील पाहायला मिळतात. 'गदर २' मध्ये तारा पुन्हा एकदा पाकिस्तानला जातो आणि आपल्या मुलाला वाचवताना दिसतो. दरम्यान यावेळी चित्रपटाची कहाणी आणखी स्फोटक असणार आहे. चित्रपटातील प्रसिद्ध गाणे 'मैं निकला गड्डी लेके' ची काही झलकही यावेळी दाखविण्यात आली आहे. तसेच सिमरत कौरची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. हा ट्रेलर झी स्टुडिओने आपल्या इंस्टाग्राम ऑफिशियल अकाउंटवर शेअर केला आहे.