महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Gadar 2 teaser : गदर 2 च्या टीझरमुळे चाहत्यांची सनी देओल उर्फ तारा सिंगबद्दलची उत्सुकता वाढली - गदर 2 च्या टीझरमध्ये एक तारा सिंग

गदर 2 चित्रपटाचा टीझर रिलीज केल्याने चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अनिल शर्मा पुन्हा एकदा गदर चित्रपटाच्या सिक्वेलचे दिग्दर्शन करत असून सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा हे पुन्हा एकदा या भागातही झळकणार आहेत.

Gadar 2 teaser
गदर 2 च्या टीझर

By

Published : Jun 12, 2023, 1:30 PM IST

मुंबई - रणबीर कपूरच्या अनिमल प्री-टीझरच्या रिलीजच्या एका दिवसानंतर सनी देओल आणि अमिषा पटेलच्या गदर 2 टा टीझर रिलीज करण्यात आला. ९ जून रोजी गदर हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला होता. त्यासोबत गदर २ चा टिझरही जोडण्यात आला होता. हाच टीझर निर्मात्यांनी आता सोशल मीडियावर रिलीज केला आहे.

गदर २ टीझरमध्ये सनी देओल साकारत असलेल्या तारा सिंगची पुन्हा एकदा लाहोरमध्ये एन्ट्री दिसते. तो पाकिस्तानचा जावई असल्याने त्याचे खातिरदारी करा नाही तर तो लाहोर दहेजमध्ये घेऊन जाईल अशा आशयाचा व्हाइसओव्हर ऐकू येतो. गदर 2 च्या टीझरमध्ये एक तारा सिंगला अ‍ॅक्शन सीक्वेन्समध्ये दाखवण्यात आले आहे, तर स्मशानभूमीवरील दुसर्‍या एका शॉटमध्ये तो कबरीवर रडताना दिसत आहे. टीझर रिलीज झाल्यानंतर लगेचच चाहत्यांनी सोशल मीडियावर आपली निराशा व्यक्त केली. कारण यामध्ये चाहत्यांची तारा सिंगकडून असलेली अपेक्षा खूप मोठी आहे.

अनिल शर्मा दिग्दर्शित हा चित्रपट 2001 मध्ये बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड मोडीत काढणारा गदरचा अत्यंत अपेक्षित सीक्वल आहे. पहिल्या बागात जिथे कथा संपली त्यानंतर २० वर्षाच्या काळानंतर पुढे काय घडले याचे कथानक या भागात पाहायला मिळणार आहे. गदर या चित्रपटात सनी देओलने तारा सिंग या ट्रक ड्रायव्हरची गोष्ट दाखवण्यात आली होती. यात तो पाकिस्तानामध्ये राहात असलेल्या सकीनासोबत प्रेमात असतो आणि तिच्या भेटीसाठी तो सिमा ओलंडून पाकिस्तानमध्ये जातो आणि घनघोर लढाऊ बाणा दाखवत सहास करतो. गदरच्या दुसऱ्या भागाची कथा 1971 च्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धावर बेतलेली आहे आणि यावेळी तारा सिंह आपला मुलगा चरणजीतला भारतात परत आणण्यासाठी पाकिस्तानला जाणार आहे. गदर दिग्दर्शक अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्माने गदरमध्ये चरणजीतची भूमिका केली होती. उत्कर्ष सिक्वेलमध्येही त्याची भूमिका पुन्हा साकारणार आहे.

गदर 2 ला बॉक्स ऑफिसवर संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित अॅनिमल आणि अक्षय कुमारची भूमिका असलेल्या ओएमजी २ शी सामना करावा लागणार आहे. अनेक ट्रेड विश्लेषकांनी या बॉक्स ऑफिसवरील टक्करीची निंद केली आहे. याचा फटका निर्मात्यांना बसू शकतो हे माहिती असताना रिलीज तारीख बदलली जाऊ शकत होती. मात्र निर्मात्यांनी बॉक्स ऑफिसवर स्वातंत्र्य दिनाचा आठवडा एन्कॅश करण्यासाठी त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्धार केला आहे. गदर 2 चित्रपट 11 ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होत आहे.

हेही वाचा -

  1. Madhu Mantena Wedding : मसाबा गुप्ताचा पूर्व पती मधु मंटेना इरा त्रिवेदीसोबत पुन्हा चढला बोहल्यावर

2.खास मराठी प्रेक्षकांसाठी बहुभाषिक ‘1 ओटीटी’ च्या मराठी प्रभागाचा शुभारंभ, स्वप्नील जोशी असेल 'ब्रँड फेस'!

3.Rubina Dilaik Car Accident: बिग बॉस फेम रुबिनाच्या कारचा अपघात; ट्विट करून दिले हेल्थ अपडेट

ABOUT THE AUTHOR

...view details