मुंबई :सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर 'गदर २' ची आता सध्या जबरदस्त क्रेझ चाहत्यांमध्ये आहे. या चित्रपटाची चर्चा ही सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. तारा सिंग आणि सकिना ही जोडी २२ वर्षांनंतर पुन्हा एकदा रूपेरी पडद्यावर परत येत आहे. 'गदर २' चित्रपटाने आगाऊ बुकिंग तिकिटे १ लाखांहून अधिक विकली गेली आहेत. 'गदर २' च्या निर्मात्यांनी भारतीय सैन्य आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग देखील आयोजित केले होते.
भारतीय लष्कराकडून चांगला प्रतिसाद : सनी देओलने स्वतः हा चित्रपट भारतीय सैन्यासोबत पाहिला. त्याचबरोबर 'गदर २' या चित्रपटाला भारतीय लष्कराकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. विशेष म्हणजे, भारतीय लष्कराच्या जवानांनी चित्रपट पाहिल्यानंतर खूप टाळ्या वाजवल्या होत्या. दरम्यान चित्रपटातील देशप्रेमाची दृष्ये पाहून भारतीय लष्कराची छाती उंच झाली आणि थिएटरमध्येच हिंदुस्थान झिंदाबादच्या घोषणा देण्यास सुरुवात झाली. सनीसोबत चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा आणि अमिषा पटेल देखील भारतीय सैन्यासाठी 'गदर २'च्या स्पेशल स्क्रीनिंगला उपस्थित होते.