मुंबई : सनी देओलचा चित्रपट 'गदर' 2 हा चित्रपट सध्याला वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. बॉलिवूड स्टार सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल यांचा चित्रपट गदर 2ची शुटिंग पंचकुलामध्ये झाली. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फोटोत केलेल्या किसिंग सीनवरून आता वाद निर्माण झाला आहे. पंचकुलाच्या एमडीसीमध्ये असलेल्या गुरुद्वारा श्री कुहानी साहिबच्यावतीने पत्रकार परिषद घेताना या दृश्यावर आक्षेप घेतला आहे.
गदर 2 वादाच्या भोवऱ्यात : गुरुद्वारा साहिबचे व्यवस्थापक सतबीर सिंग आणि सचिव शिव कंवर सिंग यांनी एकमताने सांगितले की, गुरुद्वारा श्री कुहानी साहिबमधील असे दृश्य गुरुद्वारा साहिबच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहेत. गुरुद्वारा साहिबचे व्यवस्थापक सतबीर सिंग यांनी सांगितले की, चित्रपटाची टीम शूटिंगसाठी येथे आली होती. येथे त्यांचे सेवेच्या भावनेने आम्ही त्यांचे स्वागत केले. सनी देओलला गुरुद्वारामध्ये बैसाखी उत्सवासाठी शूट करायचे आहे, अशी परवानगी त्यांनी आमच्याकडून घेतली होती. त्यांना आम्ही परवानगी दिली होती.सतबीर सिंग यांच्या म्हणण्यानुसार, या शूटिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सनी देओल अमिषा पटेलला मिठी मारून तिचे चुंबन घेत आहे. यामुळे गुरुद्वाराचे व्यवस्थापक आणि शीख संघाच्या भावना या दुखाविल्या गेल्या आहे. त्याचवेळी चित्रपटाच्या निर्मात्याने सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगबाबत आमचा कोणताही चुकीचा हेतू नव्हता. बैसाखीचा सण दाखवण्यासाठी शुटिंगची परवानगी घेण्यात आली होती.