मुंबई : सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा आगामी चित्रपट 'गदर २' सध्या प्रचंड चर्चेत आहे. आदल्या दिवशी प्रदर्शित झालेल्या 'उड जा काले कावा' या गाण्याच्या रिप्राइज्ड व्हर्जनने प्रेक्षकांची मने जिंकली. दरम्यान, आता निर्मात्यांनी 'मैं निकला गड्डी लेके'ची रिप्राइज्ड व्हर्जन रिलीज केले आहे. हे गाणे दोन दशकांपूर्वी ब्लॉकबस्टर ठरले होते. या नवीन व्हर्जनची खूप प्रशंसा केली जात आहे. आता सोशल मीडियावर हे गाणे खूप व्हायरल झाले आहे. 'गदर २' चित्रपटातील अनेक गाणे हे हिट झाले होते. आता पुन्हा एकदा या नवीन व्हर्जनने सनी देओल रूपेरी पडद्यावर धुमाकुळ घालणार आहे.
ट्रेंडिंग गाणे :'मैं निकला गड्डी लेके' गाण्याची सुरुवात उत्कर्ष शर्मा (चरणजीत) हा वडील सनी देओल (तारा सिंग) यांच्याकडे मोटारसायकलची मागणी करतो. यावर अमिषा पटेल म्हणजेच सकिना मुलाची बाजू घेताना दिसत आहे. त्यानंतर गाण्यात एक पार्टी दाखविण्यात आली आहे. या पार्टीत तारा सिंग आपल्या मुलाला बाईक गिफ्ट करतो. त्यानंतर आयकॉनिक ट्रॅकवर तारा सिंग , चरणजीत आणि सकिना डान्स करतात. गाण्यामध्ये सनी आणि अमिषा यांच्यातील एक रोमँटिक सीक्वेन्स देखील दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये तारा सिंह आणि सकिना यांच्यातील प्रेम दोन दशकांनंतरही कायम आहे. हे गाणे खूप जबरदस्त आहे.