महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Gadar 2 Box office collection day 5 : सनी देओल स्टारर 'गदर २' ने केला २०० कोटींचा आकडा पार... - अमीषा पटेल

सनी देओल स्टारर चित्रपट 'गदर २' बॉक्स ऑफिसवर खूप कमाई करत आहे. स्वातंत्र्यदिनी या चित्रपटाने एक नवा विक्रम नावावर केला केला आहे. 'गदर २'ने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे.

Gadar 2
गदर २

By

Published : Aug 16, 2023, 11:25 AM IST

मुंबई : सनी देओलच्या 'गदर २' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. २२ वर्षांपूर्वीच्या 'गदर एक प्रेम कथा'प्रमाणेच हा त्याचा सिक्वलही बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. 'गदर २' चित्रपटावर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. सनी देओल आणि अमिषा पटेल गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत होते. आता त्यांना त्यांच्या मेहनतचे फळ मिळाले आहे. सनी देओलच्या 'गदर २' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ४० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवून सर्वांना चकित केले होते, तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ४३ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी या चित्रपटाने कलेक्शनच्या बाबतीत ५० कोटींचा मोठा आकडा पार केला.

'गदर २'ची एकूण कमाई : चौथ्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३९ कोटी कमाविले. यानंतर या चित्रपटाने पाचव्या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी ५५ कोटीची कमाई करून २०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाची एकूण कमाई २२८.८८ कोटीची झाली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने जात आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर 'गदर २' हा ब्लॉकबस्टर चित्रपट झाला आहे. हा चित्रपट 'गदर एक प्रेम कथा'चा सीक्वल असून या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. यावेळी या चित्रपटामधील गाणे देखील खूप हिट झाले होते. दरम्यान 'गदर २'मध्ये जुन्या गाण्याचे नवीन व्हर्जन तयार केले आहे. हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

रूपेरी पडद्यावर सनी देओलला पाहण्यासाठी चाहते 'बेताब': 'गदर २' या चित्रपटामधील डायलॉग हे जबरदस्त असून या चित्रपटाचे कौतुक सोशल मीडियावर होत आहे. या चित्रपटाच्या काही छोट्या व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चाहत्यांनी शेअर केल्या आहेत. या क्लिप पाहून प्रेक्षक आणखी उत्साहित होऊन हा चित्रपट पाहण्यासाठी जात आहे. 'गदर २' चित्रपट लवकरच ५०० कोटी कमवेल असा अंदाज ट्रेड पंडित व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

  1. Elvish Yadav : एल्विश यादव ठरला 'बिग बॉस ओटीटी २'चा विजेता ; अभिषेक मल्हानने पटकविले दुसरे स्थान...
  2. Taali Web Series Released : सुष्मिता सेन स्टारर 'ताली' वेब सीरीज प्रदर्शित....
  3. Gadar 2 Collection Day 4 : 'गदर २' चित्रपटाने चौथ्या दिवशी 'इतकी' केली कमाई...

ABOUT THE AUTHOR

...view details