मुंबई - Fukrey 3 Song Out: 'फुक्रे'च्या फ्रँचायझीनं आतापर्यत प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. दरम्यान आता या कॉमेडी ड्रामाचा तिसरा भाग म्हणजेच 'फुक्रे 3' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. दरम्यान आता 'फुक्रे 3'चं पहिलं गाणं 'फुक्रे वे' हे रिलीज झालं आहे. या चित्रपटात खूप कॉमेडी असणार आहे. कारण सोशल मीडियावर या चित्रपटामधील काही क्लिप या व्हायरल झाल्या आहेत. या व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये जबरदस्त कॉमेडी दाखविण्यात आली आहे. हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच अनेक चाहते या चित्रपटाला पसंती दर्शवित आहेत.
'फुकरे वे' गाणं रिलीज :'अंबर सारिया', 'बेडा पार' आणि 'करले जुगाड करले' आजही हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडतात. 'फुक्रे 3'चं पहिलं गाणं 'फुक्रे वे' रिलीज झाल्यानंतर या गाण्याला खूप चाहते पसंत करत आहे. या गाण्यात पंडितजी हनी, चुचा आणि लालीसोबत नाचताना दिसत आहेत. 'फुक्रे वे' गाण्यात पंडितजींचं वेगळे रूप पाहायला मिळत आहे. पंकज त्रिपाठी गाण्यामध्ये खूप आकर्षण दिसत असून या गाण्यात बाकी कलाकारांनी खूप चांगला डान्स केला आहे. देव नेगी आणि असीस कौर यांनी 'फुक्रे 3' च्या या ट्रॅकला आपला आवाज दिला आहे. 'फुक्रे वे' हे गाणं तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केले आहे. गाण्याचे बोल शब्बीर अहमद यांनी संगीतबद्ध केले आहेत, तर कोरिओग्राफी ही बॉस्को मार्टिसने केली आहे.