महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'डंकी'चा ट्रेलर पाहून नेटिझन्सचे नाना तर्क वितर्क, कल्पनाविलासाची गगन भरारी - डंकीचा ट्रेलर पाहून नेटिझन्सचे तर्क

अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'डंकी'चा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित झाला. यात अनेक प्रसंग आहेत. या प्रसंगांची जंत्री जमवत नेटिझन्सनी आपली एक स्वतःची कथा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. यात काहींना शाहरुख गुप्तहेर वाटतो तर यात विकी कौशलचं पात्र मरत असल्याचा तर्कही लावला आहे. पाहा ट्रेलर पाहून नेटिझन्स काय कल्पनाविलास करताहेत.

Reasoning of netizens after seeing Dunki drop 4
'डंकी'चा ट्रेलर पाहून नेटिझन्सचे नाना तर्क वितर्क

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 4:16 PM IST

मुंबई - शाहरुख खानच्या 'डंकी' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर मंगळवारी लॉन्च करण्यात आला. ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या दृष्यांवरुन चाहत्यांनी कथानकाचे स्वतःचे ठोकताळे बांधण्यास सुरुवात केली आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी मांडलेल्या कल्पनाविलासाला कोणतीही सीमा नाही, हे ट्रेलर पाहून व्यक्त केलेल्या तर्कावरुन दिसत आहे.

तीन मिनिटांचा ट्रेलर अ‍ॅक्शन, विनोद, रोमान्स आणि ड्रामासह एक रोमांचक साहसाचं दर्शन घडवतो. ट्रेलरच्या सुरुवात शाहरुख साकारत असलेल्या हार्डीच्या आवाजानं होते. तो पहिल्यांदा जेव्हा पंजाबमधील लाल्टू गावात येतो आणि तिथे त्याची भेट चार अवलिया मित्रंशी होते. या चौघांनाही परदेशात जायचे आहे आणि त्यासाठी त्यांना इंग्रजी शिकायचं आहे. अखेर बेकायदेशीरपणे परदेशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. या प्रवासात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

आता हा ट्रेलर पाहून नेटिझन्सनी आपल्या कथा सांगायला सुरुवात केली आहे. काहींनी असा अंदाज लावला की शाहरुख यामध्ये कदाचित गुप्त एजंटची भूमिका करत असेल कारण तो एका दृश्यात AK47 सोबत दिसत होता. इतरांनी असा सल्ला दिला की शाहरुख कदाचित रॉ एजंट असू शकतो जो कदाचित एखाद्याला संपवण्यासाठी या वेशात आला आहे.

ट्रेलरमधील अंत्यसंस्कारातील एका दृश्याचा संदर्भ देत, नेटिझन्सने असा निष्कर्ष काढला की हे विक्की कौशलचे पात्र असू शकते ज्याने व्हिसा नाकारल्यानंतर आत्महत्या केली असावी. चाहत्यांच्या अटकळ इथेच थांबत नाहीत. ट्रेलरमधील दुसर्‍या फ्रेममध्ये, शाहरुख एका चर्चमध्ये तापसी पन्नूसोबत ख्रिश्चन वधूच्या वेषात दिसत आहे. या दृश्याने नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी दावा केला की कदाचित शाहरुख तिला ग्रीन कार्डसाठी लग्न करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत आहे.

आणखी एकानं लिहिले: "मला वाटते की मनू सुखीच्या प्रेमात आहे, शाहरुख जीवनाच्या अनेक टप्प्यांतून जाईल. मला वाटते की 'त्यांना परत आणण्यासाठी एका सैनिकाचा प्रवास' अशी ही डंकी चित्रपटाची मुख्य थीम असेल." यापैकी कोणतीही अटकळ खरी ठरते का हे पाहणे मनोरंजक ठरेल.

अवैध मार्गानं परदेशात एन्ट्री केलेल्या प्रवाशांना कशा प्रकारे अडचणींनी सामोरं जावं लागतं याचं वास्तव मांडणारी चार मित्रांची कथा, अशा प्रवासाचा विचार करणाऱ्यांसह, सरकारी यंत्रणा, बेरोजगारी, कुंटुबासाठी काही तरी करायचं हे जिद्द बाळगणारे तरुण यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचा हा राजकुमार हिराणीचा वेगळा प्रयत्न असू शकतो. राजकुमार हिराणी आणि गौरी खान निर्मित, डंकी हा चित्रपट जिओ स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्सची निर्मिती आहे. 1 डिसेंबर रोजी जगभरात रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

1. 'अ‍ॅनिमल' चित्रपटासाठी रणबीर कपूरनं वाढवलं 11 किलो वजन, पाहा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन

2.डंकी ड्रॉप 4 एक्स रिव्ह्यू : शाहरुख आणि हिराणीचा जयजयकार, किंग खानच्या हॅट्रीकची फॅन्सना खात्री

3.अजय देवगण आणि तब्बू यांच्या 'औरों में कहाँ दम था' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

ABOUT THE AUTHOR

...view details