महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

B-town divas on red carpet : जान्हवी कपूर ते अनन्या पांडे आणि क्रिती सेनॉनपर्यंत, सौंदर्यवतींचा रेड कार्पेटवर जलवा - अनुष्का शर्मा

जान्हवी कपूरपासून ते अनन्या पांडे आणि क्रिती सेनॉनपर्यंत, मुंबईत शुक्रवारी रात्री झालेल्या एका अवॉर्ड गालामध्ये बॉलिवूडच्या सौंदर्यवती अभिनेत्रींनी धुमाकूळ घातला. अनुष्का शर्मा, शहनाज गिल, तेजस्वी प्रकाश आणि इतरांनीही विचित्र पोशाखांमध्ये आपली उपस्थिती दर्शवली.

सौंदर्यवतींचा रेड कार्पेटवर जलवा
सौंदर्यवतींचा रेड कार्पेटवर जलवा

By

Published : Mar 25, 2023, 11:40 AM IST

मुंबई- ग्लिट्झ आणि ग्लॅमर नेहमीच एकमेकांच्या हातात हात मिळवून चालत असतात. असाच काहीसा प्रकार मुंबईत शुक्रवारी रात्री घडला जेव्हा बॉलिवूड सेलिब्रिटींनी रेड कार्पेट जबरदस्त जलवा दाखवला. जान्हवी कपूर, अनन्या पांडे, क्रिती सेनॉन आणि इतरांनी अवॉर्ड शोसाठी आपली उपस्थिती दाखवली.

सिक्विन गाऊन परिधान करून जान्हवी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट कपडे घातलेल्या सेलिब्रिटींमध्ये होती. अभिनेत्री जान्हवीने थाय स्लिट आणि कंबरेभोवती कट-आउट डिटेल्स असलेले सिक्विन गाउन निवडले. अनन्या पांडेनेही काळ्या एलिसाबेटा फ्रँची पेहरावात सर्वांना चक्रावून सोडले. अभिनेत्री अनन्याने तिचे केस बनमध्ये बांधले आणि चकचकीत मेकअप आणि स्मोकी डोळ्यांनी आपले रुप सजवले. उंच कॉलर आणि नक्षीदार बिब असलेल्या जर्सीच्या लांब ड्रेसमध्ये अनन्या अतिशय सुंदर दिसत होती.

आपल्या आकर्षक स्टाईलचा खेळ सुरू ठेवत, क्रिती सेनॉनने नम्रता जोशीपुराच्‍या जोडीमध्‍ये आणखी एक प्रभावी स्टाईल स्टेटमेंट केले. क्रितीने सजवलेला रनवे आउटफिट हा नम्रता यांच्या नवीनतम कलेक्शन द फर्स्ट ऑर्डरमधील आहे, ज्याचे तिने लॅक्मे फॅशन वीक 2023 मध्ये लॉन्चिंग केले होते.

पुरस्कार सोहळ्यात आपली उपस्थिती अनुभवणारी आणखी एक अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. तिने डायमंड ज्वेलरीसह जोडलेल्या काळ्या पोशाखात अभिनेत्री आकर्षक दिसत होती. या पोशाखात दोन्ही बाजूंनी कट आणि एक मिनी ट्रेल आहे. अनुष्काने तिचे केस स्लीक बनमध्ये बांधले आणि अवॉर्ड नाईटसाठी हलका मेकअप आणि लिपस्टिकचा वापर केला.

दरम्यान, शहनाज गिल, तेजस्वी प्रकाश, मौनी रॉय, अमिषा पटेल आणि इतर अनेकांनी या अवॉर्ड शोमध्ये हजेरी लावली. अर्जुन कपूर आणि वरुण धवनही या कार्यक्रमात स्टायलिश दिसले. अर्जुनसोबत त्याची प्रेयसी मलायका अरोरा होता, तर वरुण क्रिती आणि अनुष्कासोबत रेड कार्पेटवर पोज देताना दिसला. बॉलिवूडचे हे तारे तरका जेव्हा कोणत्यादी पुरस्कार सोहळ्याला उपस्तित असतात तेव्हा त्यांच्या स्टाईलची जोरदार चर्चा होत असते. रेड कार्पेटवर त्यांच्या लेटेस्ट स्याईल पाहणे हा एक दीव्य सोहळाच असतो, जो या कार्यक्रमात उपस्थितांनी अनुभवला.

हेही वाचा -Jubilee Trailer: हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळात घडलेल्या प्रेम, विश्वासघात आणि सूडाची रोमांचक कथा

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details