मुंबई - Indian 2 major update : दिग्गज अभिनेता कमल हासन आणि शंकर यांच्या 'इंडियन 2' या चित्रपटाची पहिली झलक 3 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासाठी चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. दरम्यान आता या चित्रपटाचे निर्माते लायका प्रॉडक्शननेही याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. लायका प्रॉडक्शन ट्विटमध्ये लिहिले आहे, 'सेलिब्रेशन लवकर सुरू झाले आहे. 3 नोव्हेंबरला रिलीज होणाऱ्या 'इंडियन-2 इंट्रो साठी सज्ज व्हा. 'इंडियन-2'ची पहिली झलक.' याशिवाय निर्मात्यांनी 'इंडियन 2'मधील एक पोस्टरही रिलीज केले आहे, ज्यामध्ये कमल हासन दिसत आहेत.
चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक : 'इंडियन 2'चे निर्माते 3 नोव्हेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा करणार आहे. कमल हसन पुन्हा एकदा 'इंडियन 2' मधून रुपेरी पडद्यावर अॅक्शन स्टंट करताना दिसणार आहे. कमल हासन व्यतिरिक्त या चित्रपटात काजल अग्रवाल, प्रिया भवानी शंकर, सिद्धार्थ, रकुल प्रीत सिंह आणि बॉबी सिम्हा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनिरुद्ध रविचंदरनं या चित्रपटाला संगीत दिले आहे. 7 नोव्हेंबर रोजी कमल हासनचा वाढदिवस आहे. चाहते कमल हसनची एक झलक पाहण्यासाठी सध्या आतुर झाले आहेत. याशिवाय शेअर केलेल्या पोस्टमध्ये कमेंट करून चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल अनेक प्रश्न विचारत आहेत.