मुंबई - Fighter song Sher Khul Gaye: हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित 'फायटर' चित्रपटाच्या निर्मात्यांनी १५ डिसेंबर रोजी चित्रपटातील पहिले गाणे रिलीज केले. प्रमोशनच्या पारंपारिक मार्गावरून न चालता चित्रपटाच्या टीमने ट्रेलरच्या आधी संगीताचा ट्रेंड स्वीकारला आहे. या गाण्याच्या लॉन्चिंगसाठी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या गाण्यामध्ये हृतिक आणि दीपिका या करिश्माई जोडी थिरकताना दिसत आहे.
आपल्या जबरदस्त नृत्य कौशल्यासाठी ओळखला जाणारा हृतिक रोशन 'शेर खुल गए' गाण्यावर त्याच्या नेहमीच्या ऊर्जेनं थिरकला आहे. त्याला बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्सर का म्हणतात हे त्यानं या गाण्यातून पुन्हा एकदा सिद्ध केलंय. बॉस्को मार्टिस आणि सीझर गोन्साल्विस यांनी कोरिओग्राफ केलेल्या या गाण्यावर अप्रतिम डान्स करुन दीपिका पदुकोणनेही त्याला उत्तम साथ दिली आहे. हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री पडद्यावर किती कमाल करु शकते याचा प्रत्यय या गाण्यामुळे येऊ शकतो.
'फायटर'मधील शेर खुल गए गाणे सोशल मीडियावर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, "प्रतीक्षा संपली! स्क्वॉड्रन लीडर्स शमशेर पठानिया उर्फ 'पॅटी' आणि मिनल राठौर उर्फ 'मिन्नी'सह डान्स फ्लोअरवर मुव्ह करा."
'फायटर'मधील 'शेर खुल गए' हे गाणे विशाल ददलानी आणि शेखर रावजियानी यांनी संगीतबद्ध केले आहे. गाण्याचे बोल कुमार आणि विशाल ददलानी यांनी लिहिले आहेत. हे पार्टी गीत बेनी दयाल आणि शिल्पा राव यांनी गायले आहे तर विशाल आणि शेखर यांनीही या गाण्याला आवाज दिला आहे.
'शेर खुल गए'चे संक्रामक बीट्स प्रसिद्ध संगीत जोडी विशाल ददलानी आणि शेखर रावजियानी यांनी संगीतबद्ध केले आहेत. कुमार आणि विशाल ददलानी यांनी लिहिलेल्या या दमदार पार्टी अँथमने मंचाला आग लावली. हा ट्रॅक बेनी दयाल आणि शिल्पा राव यांचा आहे, तर त्यात स्वतः विशाल आणि शेखर यांचे डायनॅमिक आवाज देखील आहेत ज्यामुळे अधिक सुंदर झालं आहे.
'शेर खुल गए' गाण्याच्या रिलीजसाठी याहून उत्तम वेळ दुसरी असू शकणार नाही. कारण आता वर्ष अखेर सुरू झालं असून जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हे सर्वोत्तम गाणं ठरु शकतं.