महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

हृतिक आणि दीपिकाच्या फायटरचे फर्स्ट लूक पोस्टर आऊट, रिलीजची तारीखही जाहीर - हृतिक दीपिका चित्रपट पोस्टर

फायटर चित्रपटाच्या निर्मात्यांनी शुक्रवारी फर्स्ट लूक पोस्टरचे अनावरण केले. फर्स्ट लूक पोस्टरसह, निर्मात्यांनी फायटरच्या रिलीजची तारीख देखील जाहीर केली आहे. हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

फायटरचे फर्स्ट लूक पोस्टर आऊट
फायटरचे फर्स्ट लूक पोस्टर आऊट

By

Published : Oct 28, 2022, 4:08 PM IST

मुंबई- हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांची भूमिका असलेल्या फायटरच्या निर्मात्यांनी शुक्रवारी चित्रपटाच्या फर्स्ट लुक पोस्टरचे अनावरण केले. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित फायटर हा भारतातील पहिला एरियल अॅक्शन प्रकारचा चित्रपट असेल.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि चित्रीकरण तंत्र वापरून आणि जगभरातील लोकेशन्सवर शूट करण्यात आला आहे. फर्स्ट लूक पोस्टरसह, निर्मात्यांनी फायटरच्या रिलीजची तारीख देखील जाहीर केली. हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. यापूर्वी फायटर 26 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहात येणार होता.

फायटरचे फर्स्ट लूक पोस्टर आऊट

चित्रपटाबद्दल बोलताना, निर्मात्यांनी आधी सांगितले होते की हा चित्रपट भारतीय चित्रपटाला जागतिक स्तरावर प्रेक्षकांना थिएटरिक अनुभव देण्याची क्षमता राखणार आहे.

वायाकॉम 18 स्टुडिओ, ममता आनंद, रॅमन चिब्ब आणि अंकू पांडे यांनी हा चित्रपट बँकरोल केला आहे. फायटर हा एक अनोखा सिनेमॅटिक अनुभव देणारा एरियल अॅक्शन चित्रपट आहे. स्क्रिप्ट एरियल अॅक्शन एक्सप्लोर करणारी आहे. फायटरसह, निर्माते एक फ्रेंचायझी तयार करण्याचे लक्ष्य ठेवत आहेत.

बँग बँग (2014) आणि वॉर (2019) नंतर, फायटर तिसऱ्यांदा हृतिक आणि सिद्धार्थला एकत्र करणार आहे. दरम्यान, यात हृतिक पहिल्यांदाच दीपिकासोबत पडद्यावर एकत्र दिसणार आहे. हृतिक आणि दीपिका यांच्या शिवाय फायटरमध्ये अनिल कपूरही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा -एसआरके, प्रियांका, तापसीसह सेलेब्रिटींनी बीसीसीआयच्या समान वेतनाच्या घोषणेचे केले कौतुक

ABOUT THE AUTHOR

...view details