महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Farhan Akhtar in Ms. Marvel : 'मिस मार्व्हल' मालिकेत झळकणार फरहान अख्तर

फरहान अख्तरच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. 'मिस मार्व्हल' या आंतरराष्ट्रीय मालिकेमध्ये तो काम करीत असल्याचे निश्चित झाले आहे. 'मिस मार्व्हल' ही मालिका 8 जून रोजी प्रीमियर होणार आहे.

फरहान अख्तर
फरहान अख्तर

By

Published : May 7, 2022, 12:29 PM IST

वॉशिंग्टन -बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता फरहान अख्तर ( Farhan Akhtar is ) 'मिस मार्व्हल' ( Ms. Marvel ) मालिकेमध्ये दिसणार आहे. ही गोष्ट निश्चित झाली आहे. फरहानच्या व्यक्तिरेखेबद्दलचे तपशील अद्याप गुलदस्त्यात आहेत. तथापि, फरहानने 'मिस'मधील त्याच्या भूमिकेबद्दल काहीही पोस्ट केलेले नाही.

'मिस मार्व्हल' हा अत्यंत अपेक्षित मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स (MCU) प्रकल्पांपैकी एक आहे. यात इमान वेल्लानी ही कमला खान ही मुख्य व्यक्तीरेखा साकारत आहे. कमला ही एक जर्सी शहरात वाढणारी एक मुस्लिम अमेरिकन किशोरवयीन मुलगी आहे.

अरामिस नाइट, सागर शेख, रिश शाह, झेनोबिया श्रॉफ, मोहन कपूर, मॅट लिंट्झ, यास्मीन फ्लेचर, लैथ नकली, अझहर उस्मान, ट्रविना स्प्रिंगर आणि निमरा बुचा हे देखील 'मिस मार्व्हल'चा भाग आहेत. 'मिस मार्व्हल' ही मालिका 8 जून रोजी प्रीमियर होणार आहे.

हेही वाचा -केएल राहुलसोबत अथिया शेट्टीची 'आळी मिळी गुपचिळी'!! पाहा फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details