मुंबई - क्रिकेट सामन्यांमध्ये आपल्या कामगिरीने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटणारा क्रिकेटपटू शुभमन गिल हा बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानसोबतच्या प्रेमप्रकरणासह विविध कारणांमुळे चर्चेत असतो. शुभमन हा स्पायडर-मॅन: अॅक्रॉस द स्पायडर-व्हर्स या चित्रपटाच्या हिंदी आणि पंजाबी व्हर्जनला आपला आवाज देणार आहे. तसेच या या चित्रपटाचे प्रमोशन हे जोरदार पद्धतीने सुरू आहे. शिवाय इंस्टाग्रामवर पापाराझी अकाऊंटद्वारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शुभमन मागून कारवर चढताना आणि स्पायडर-मॅन लँडिंगची प्रतिष्ठित मुद्रा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
खरचं सारा आणि शुभमन गिल करत आहे डेट : हा व्हिडिओ शेअर होताच सोशल मीडिया वापरकर्ते कमेंट विभागात रेड हार्ट इमोजी टाकले. एका वापरकर्त्याने लिहिले, शुभमन ऑन फायर (फायर इमोजीसह).' दुसर्याने आनंदाने लिहिले, 'स्पायडर मॅन मेरी ताकत का गलत इस्तेमाल हो राहा है' आणखी एकाने लिहिले, 'स्पायडर-मॅन अल्ट्रा लाइट. तसेच दुसऱ्या वापरकर्त्याने अभिनेत्री सारा अली खानला डेट केल्याबद्दल कमेंट करत क्रिकेटरला छेडत म्हटले, 'साराच्या घरी पण असेच जातो का ? त्यानंतर पुढे लिहले तुम्ही साराच्या घरी अशा प्रकारे जा. अशा अनेक प्रकारच्या कमेंट या पोस्टवर आहे. दरम्यान, शुभमन गिल आणि सारा अली खान काही काळापासून डेट करत असल्याचं कळतंय.