मुंबई :अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांचा डेब्यू टेलिव्हिजन शो पवित्र रिश्ताला गुरुवारी १४ वर्षे पूर्ण झाली आहे. या प्रसंगी अंकिताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. ज्यात तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिने आपल्या पोस्टला कॅप्शन देत लिहले, 'पवित्र रिश्ताची 14 वर्षे पूर्ण झाली आहेत, तरीही मला माझ्या पहिल्या बाळाशी खूप जोडल्या सारखे वाटते.. प्रत्येक गोष्टीसाठी देवाचे आभार!! एकता कपूर तुमचे खूप खूप आभार. की मी तुमची अर्चू होऊ शकेन हा माझ्यावर तुम्ही नेहमी विश्वास ठेवला आणि अर्चना म्हणून मला नवीन ओळख दिल्याबद्दल थँकू कारण शो दरम्यान ज्या लोकांनी माझ्यावर प्रेम केले ते मला पाहतात किंवा भेटतात तेव्हा ते देखील, मला अर्चू या नावने हाक मारतात त्यावेळी मला खूप चांगले वाटते.. तसेच सर्वांचे मनःपूर्वक आभार ज्यांनी पवित्र रिश्ता नावाचा सुंदर कार्यक्रम मनापासून आणि जिवाभावाने पाहिला आहे.. मी सदैव त्यांची ऋणी आहे'. असे अंकिताने इंस्टाग्रामवर पोस्ट केली.
पवित्र रिश्ता शो : एकता कपूरने तयार केलेला हा शो मानव (सुशांत) आणि अर्चना (अंकिता) या विवाहित जोडप्याभोवती फिरणारा होता. या शोद्वारे हे दोघे घराघरात लोकप्रिय झाले होते. खरं तर, केवळ रील लाइफमध्येच नाही तर शोच्या शूटिंगदरम्यान दोघे खऱ्या आयुष्यात एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मात्र, जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ते दोघे वेगळे झाले. अकिंताने पोस्ट टाकल्यानंतर लगेचच, चाहत्यांनी लाल हार्ट इमोजी आणि भावनिक संदेशांसह कमेंट केली आहे. अकिंताच्या या पोस्टवर भरभरून कमेंट येत आहे. एका चाहत्यांने या पोस्टवर लिहले, 'सुशांत तुला प्रत्येक मिनिटाला मिस करतोस,' दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, 'होय हा माझा सर्वात आवडता शो होता. अशा अनेक कमेंट चाहते करत आहे.