मुंबई Jawan Movie : शाहरुख खानच्या 'जवान'बाबत लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. शाहरुख खान आपल्या चित्रपटाचे वेगळ्या पद्धतीने प्रमोशन करत आहे. शाहरुख चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी देवाचे दर्शन घेत आहे आणि चित्रपटासाठी प्रार्थना करत आहे. शाहरुख खानच्या 'जवान'ची अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. 'जवान' चित्रपटाची तिकिटे प्रचंड प्रमाणात विकली गेली आहेत. दरम्यान आता ऑफलाइनही चित्रपटाची तिकिटे विकली जात आहेत. लोक ऑफलाइन तिकिट खरेदी करण्यासाठी जात आहेत. आता ऑफलाइन चित्रपटाची तिकिटे खरेदी करत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
'जवान' चित्रपटाची तिकिट खरेदी : शाहरुख खानच्या 'जवान'ची जादू मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. काल रात्री 'जवान' चित्रपटाची तिकिटे बुक करण्यासाठी लोकांनी चित्रपटगृहाबाहेर प्रचंड गर्दी केली होती. या चित्रपटाची प्रचंड क्रेझ दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रात्री 2 वाजता लोक थिएटरबाहेर रांगेत उभे आहेत. व्हायरल झालेला हा व्हिडिओ शाहरुख खानच्या फॅन क्लबवरून शेअर करण्यात आला आहे. शाहरुखचे चाहते पहाटे 2 वाजता रांगेत उभे आहेत. हे चाहते खिडकी उघडण्याची वाट पाहात आहेत. फॅन पेजनुसार हा व्हिडिओ महाराष्ट्रातील मालेगावचा आहे. मुंबई, कोलकाता, मोतिहारी अशा अनेक शहरांमध्ये पहाटे पाच वाजता 'जवान'चा पहिला शो आयोजित करण्यात येणार आहे. 'जवान' चित्रपटाची क्रेझ पाहता सकाळचा शो आयोजित करण्यात येत आहे.