मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहिद कपूर ( Shahid Kapoor ) त्याच्या 'फर्जी' या वेबसीरिजद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. चाहतेही या वेब सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, 'फर्जी' चित्रपटाचा ट्रेलर ( trailer of Ferzi ) आज रिलीज झाला आहे. हा ट्रेलर पाहिल्यानंतर फर्जी पाहण्याची लोकांची उत्सुकता आणखी वाढणार आहे. पण घाई करु नका, आधी 'फर्जी'च्या फेक ट्रेलरबद्दल ( Fake trailer of Shahid Kapoor Ferzi movie ) जाणून घ्या. आज 'फर्जी'चा फेक ट्रेलर रिलीज झाला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हीही हसायला लागाल.
फर्जी ट्रेलरसह फर्जी शाहिद - खरं तर, 'फर्जी'च्या निर्मात्यांनी शोबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी एक अनोखा मार्ग अवलंबला आहे. 'फर्जी'च्या निर्मात्यांनी ट्रेलर रिलीज केला, पण खोटा ट्रेलर आहे. हा ट्रेलरही वेब सीरिजच्या नावाप्रमाणेच फर्जी आहे. 'फर्जी'चा ट्रेलर बघायला लागताच पुढच्याच क्षणी तुम्हाला धक्का बसेल. ट्रेलर पाहिल्यानंतर एका क्षणी तुमची फसवणूक होईल आणि दुसऱ्याच क्षणी तुम्ही पोट धरून हसायला लागाल. कारण तुम्हाला ट्रेलर तर सापडेलच पण त्यात शाहिद कपूरही फर्जी असेल.