हैदराबाद- मल्याळम फिल्म इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट कलाकार फहाद फासिल 8 ऑगस्ट रोजी त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. फहादला 'पुष्पा - द राइज' या चित्रपटामुळे देशभर ओळख मिळाली. वाढदिवसानिमित्त फहादने पत्नी नाझरिया नाझिमसोबत केक कापला आणि सेलेब्रिशनला सुरुवात केली. केक कटिंगचे फोटो फहादने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
फहादने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तो साध्या लूकमध्ये दिसत आहे आणि त्याच्यासोबत त्याची पत्नी नाझरिया उभी आहे. नाझरियाने डेनिम आणि ब्लॅक शर्ट घातला आहे आणि ती खूप सुंदर दिसत आहे.
एका फोटोत दोघे खूप जवळ आले आहेत आणि एकत्र केक कापत आहेत. नाझरिया नाझीम स्वतः मल्याळम अभिनेत्री आणि निर्माती आहेत. केरळमधील अलप्पुझा येथे जन्मलेल्या फहाद फासिलला 'पुष्पा - द राइज' या चित्रपटातील आयपीएस अधिकारी भंवर सिंह शेखावतच्या भूमिकेमुळे देशभर मोठी ओळख मिळाली आहे.
फहादने आपल्या वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या 'कायथुम दुरथ' (2002) या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. फहादचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतका मोठा फ्लॉप ठरला की तो अभिनय सोडून अमेरिकेला गेला होता.