मुंबई - चित्रपट निर्माता करण जोहरचा 50 वा वाढदिवस ही खरोखरच लक्षात ठेवण्यासारखी रात्र होती. माजी पत्नी किरण रावसोबत अभिनेता आमिर खानचा दिसल्याने त्याचा वाढदिवस आणखी खास झाला.
आमिर आणि किरण पार्टीत एकत्र पोहोचले आणि कार्यक्रमस्थळी तैनात असलेल्या हौशी फोटोग्राफर्सना आनंदाने पोजही दिली. टी-शर्ट, जॅकेट आणि डेनिमच्या जोडीमध्ये आमिरने फॅशन स्टेटमेंट केले. दुसरीकडे, किरणने या प्रसंगी चमकदार चांदीचा ड्रेस घालून तिचा लूक सुंदर ठेवला होता.
विभक्त झाल्याची घोषणा केल्यानंतर आमिर आणि किरणचे एकत्र दर्शन फार क्वचित होत असते. त्यामुळे सर्वांच्या नजरा या जोडीवर खिळल्या होत्या. जुलै 2021 मध्ये आमिर आणि किरण यांनी संयुक्त निवेदनाद्वारे त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली होती.
''या १५ वर्षांच्या एकत्र प्रवासात आम्ही जीवनाचे आनंद, दु:ख असे अनेक अनुभव घेतले. या कालावधीत आमची मैत्री विश्वास, प्रेम आणि आदर या तीन गोंष्टींमुळे नाते बहरत गेले. आता आम्ही आमच्या जीवनाच्या नवीन प्रवासाला सुरूवात करणार आहोत. पती पत्नी नाही तर पालक म्हणून. आम्ही खूप आधीपासून वेगळे होण्याचा विचार करत होतो. आता आम्ही वेगळे राहू मात्र, आम्ही एकत्रच जीवन जगू.
''आम्ही एकत्रित आझानचा सांभाळ करणार आहोत. याशिवाय आम्ही आता पानी फाऊंडेशन तसेच इतर चित्रपटांच्या निर्मितीतही एकत्र काम करू. माझ्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराचे आभार. ज्यांनी आमची ही परिस्थिती समजून घेतली. आम्ही त्यांच्याशिवाय हा निर्णय घेऊ शकलो नसतो. मी तुम्हा सर्वांना सांगू ईच्छितो,की घटस्फोट हा शेवट नसून नवीन जीवनाची सुरुवात आहे.'', असे त्यांनी एकत्र निवेदन प्रसिध्द करुन विभक्त होत असल्याचेी घोषणा केली होती.
28 डिसेंबर 2005 रोजी आमिर आणि किरणचे लग्न झाले. त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे आझादचे 2011 मध्ये सरोगसीद्वारे स्वागत केले. आमिरचे आधी रीना दत्ताशी लग्न झाले होते, परंतु 2002 मध्ये ते वेगळे झाले. त्याला त्याच्या पहिल्या लग्नापासून एक मुलगी इरा आणि मुलगा जुनैद आहे.
हेही वाचा -करण जोहरच्या पार्टीत सबा आझादसोबत रेड कार्पेटवर अवतरला हृतिक रोशन