महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

टायगरल श्रॉफ करतोय 'कॅसोनोव्हा' गर्ल आकांक्षा शर्मासोबत डेटिंग? जाणून घ्या सत्य... - आकांक्षा शर्मा आणि टायगर श्रॉफ डेटिंग

टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी यांच्या ब्रेकअपच्या चर्चा गेल्या काही दिवसापासून मीडियात रंगल्या आहेत. अशातच आता टायगर एक नव्या मुलीसोबत डेटिंग करत असल्याची चर्चाही रंगली आहे.

Tiger Shroff and Akanksha Sharma Casanova girl
Tiger Shroff and Akanksha Sharma Casanova girl

By

Published : Aug 11, 2022, 12:13 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा छोटा सुपरहिरो टायगर श्रॉफ पुन्हा एकदा रिलेशनशिप स्टेटसमुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच टायगर श्रॉफ आणि दिशा पटनीच्या ब्रेकअपच्या बातमीने बी-टाऊनमध्ये खळबळ उडाली होती आणि आता पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. टायगर श्रॉफबद्दल असे बोलले जात आहे की तो आता आकांक्षा शर्माला डेट करत आहे. चला जाणून घेऊया कोण आहे अंकाक्षा शर्मा आणि काय आहे या प्रसिद्ध जोडप्याची पूर्ण कहाणी?

गेल्या वर्षी जर तुम्ही 'कॅसोनोव्हा' हा म्युझिक व्हिडिओ ऐकला असेल, तर तुम्हाला या मिस्ट्री गर्लला ओळखण्यात कोणतीही अडचण येणार नाही. कारण आता टायगरचे नाव ज्या अभिनेत्रीसोबत जोडले जात आहे ती दुसरी कोणी नसून केसोनोवा या गाण्यात टायगरसोबत दिसलेली आकांक्षा शर्मा आहे. याशिवाय टायगर आणि आकांक्षा 'आय एम अ डिस्को डान्सर 2.0' या गाण्यात एकत्र दिसली होती.

आकांक्षा शर्माने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती आणि ती अनेक जाहिरातींमध्येही दिसली आहे. यामध्ये ती कार्ती आणि बॉलीवूड अभिनेता वरुण धवन यांच्यासह दक्षिण सुपरस्टार महेश बाबूसोबत दिसली आहे. आकांक्षाने दक्षिण चित्रपट त्रिविक्रम (२०२०) मधून पदार्पण केले होते.

नुकतेच आकांक्षा आणि टायगर श्रॉफ एका वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र दिसले होते, ज्याचा एक व्हिडिओ आकांक्षाने शेअर केला होता. मीडियानुसार टायगर आणि दिशाने त्यांचे 6 वर्ष जुने नाते संपवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार टायगर श्रॉफने आकांक्षा शर्मासोबत डेट करण्याच्या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा -किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज'चा धमाल टिझर रिलीज

ABOUT THE AUTHOR

...view details