मुंबई- अभिनेता आयुष्मान खुरानाने आजवर अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. आता तो पहिला ॲक्शन चित्रपट ॲन ॲक्शन हिरोसाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाविषयी त्याच्याशी आमच्या प्रतिनिधीने साधलेला संवाद पुढील प्रमाणे.
तू नेहमीच आऊट ऑफ द बॉक्स विषयांना प्राधान्य देतोस. तुझ्या आगामी ॲन ॲक्शन हिरो बद्दल काय सांगशील?- ॲन ॲक्शन हिरो ही माझी पहिली ॲक्शन फिल्म आहे. मला हा जॉनर नक्कीच हाताळायचा होता. आधीही मला काही ॲक्शन फिल्म्स ऑफर झाल्या होत्या परंतु मला त्या तेव्हड्या एक्ससायटींग वाटल्या नव्हत्या. परंतु याची संहिता जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मला ती आवडली होती. परंतु मी माझ्या अनेक शंकांचं समाधान करून घेतल्यानंतरच हा चित्रपट करण्यास होकार दिला. मला ॲक्शन फिल्म तब्बल दहाएक वर्षे वाट पाहावी लागली आहे, परंतु ‘इट इज वर्थ इट’. चंदिगढ करे आशिकी साठी मी ‘बॉडी’ बनविली होती. त्यानंतर पुन्हा एकदा शरीरयष्टीवर मेहनत घेतली. तब्बल आठ महिने मी शारीरिक मेहनत घेतली या चित्रपटातील कॅरॅक्टरसाठी. आजपर्यंतच्या चित्रपटात ही मेहनत सर्वात जास्त आहे. अर्थातच हा सिनेमा पूर्णतः ॲक्शन चित्रपट असल्यामुळे असे करणे गरजेचे होते. परंतु प्रेक्षकांना ॲक्शन सोबतच भरपूर मनोरंजन मिळेल. तसा मी नेहमीच प्रयत्न केला आहे, भले वेगळ्या वाटेने, की प्रेक्षक नेहमीच मनोरंजीत हो.
आयुष्मान खुरानासोबत ईटीव्ही प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मनात काय चाललं असतं?- दहावीच्या परीक्षेला बसल्यागत वाटत असतं. (हसतो). खरंच असं वाटत राहत की शुक्रवारी दहावीचा निकाल येणार आहे. मनात धाकधुक असते की प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील. त्यामुळे नर्व्हस देखील असतो. महत्वाचं म्हणजे आम्ही या चित्रपटावर अथक मेहनत घेतली आहे. माझ्याबाबतीत बोलायचं तर, अक्षरशः. ॲन ॲक्शन हिरो मध्ये मानसिक इनव्हेसमेंट पेक्षा शारीरिक इनव्हेसमेंट जास्त होती. ॲक्शन सीन्स करताना जखमी होऊ नये याची काळजी घ्यावी लागत होती. परंतु ॲक्शन सीन्स करताना मला खूप मजा आली. परंतु सुरुवातीला मला थोडा थकवा जाणवत होता कारण कोविड मधून बाहेर पडल्यावर दोनच दिवसांत मी या भूमिकेच्या तयारीला लागलो होतो. त्यावेळेस थोडा त्रास जरूर झाला परंतु आधी सांगितल्यामुळे ‘इट वॉज वर्थ इट’.
तू फिल्म इंडस्ट्रीत नुकतीच १० वर्षे पूर्ण केलीस. याकडे तू कसे पाहतोस? - माझ्यामते, अभिनेता म्हणून माझा प्रवास फलदायी झाला आहे. अर्थात अजून खूप मोठा पल्ला गाठायचाय. मी रेडियो जॉकी म्हणून सुरुवात केली, त्यानंतर व्हिडीओ जॉकी झालो, त्यानंतर टेलिव्हिजन होस्ट म्हणून काम केलं, आणि त्यानंतर चित्रपटांचा मार्ग चोखाळला. मी देवाचे आणि विश्वाचे आभार मानतो की त्यांनी मला माझ्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त माझ्या पदरात टाकलं. माझ्यात त्याबद्दल सदैव कृतज्ञतेची भावना राहील. प्रेक्षकांनी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे आणि यापुढेही मी त्यांचे मनोरंजन करण्यात कसूर करणार नाही हे आस्वशान देतो. मी सामाजिक प्रश्नांना प्राध्यान्य असणारे सिनेमे केले आणि हा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता. परंतु आता काही वर्षे मी अश्या निर्भीड विषयांपासून लांब राहणार आहे. मी आता फक्त मनोरंजनपर चित्रपटांवर फोकस करणार आहे. अर्थात याचा अर्थ हा नव्हे की ‘तश्या’ चित्रपटांकडे मी कायमची पाठ फिरविणार आहे. तसे चित्रपट करण्याची सुरवात मी केली आहे आणि करीत राहणार आहे. फक्त तात्पुरते मी मसाला चित्रपटांना प्राधान्य देणार आहे.
ॲन ॲक्शन हिरो मध्ये तू एका फिल्म स्टार ची भूमिका साकारतोयेस. खऱ्या आयुष्याशी किती संबंध आहे? - कणभरही नाही. ॲन ॲक्शन हिरो मधील फिल्म स्टार अत्यंत गर्विष्ठ आहे. त्याला त्याच्याशिवाय दुसरं कोणी दिसत नाही वा महत्वाचं वाटत नाही. त्याची वृत्ती खूप दिखाऊ आहे आणि तो सर्वांना सतत तो स्टार असल्याची आठवण करून देत असतो. मी खऱ्या आयुष्यात पूर्णतः त्याच्या विरुद्ध आहे. त्यामुळे मी त्याच्याशी कुठेही रिलेट करीत नाही. सध्या सोशल मीडिया चा प्रत्येकाच्या आयुष्यात धुमाकूळ सुरु आहे. हा आजचा विषय आम्ही या चित्रपटातून हाताळला आहे. मीडिया ने जबाबदारीने वागायला हवे. हा चित्रपट माझा आजपर्यंतचा सर्वात ‘कमर्शियल’ सिनेमा आहे. जयदीप अहलावत हा गुणी कलाकार माझ्या अपोझिट आहे. त्याने अतिशय सुंदर काम केले आहे. त्याच्या या चित्रपटात असण्याने सिनेमाला अधिक उंची प्राप्त झाली आहे. पहिल्यांदाच माझ्या चित्रपटात हिरोईन नाहीये तसेच मला पहिल्यांदाच ॲक्शन करताना बघताना प्रेक्षकांना वेगळीच मजा येईल.
तू जवळपास सर्वच प्रकारचे सिनेमे केले आहेत. आता कुठला जॉनर तुला हाताळायचा आहे?- हॉरर-कॉमेडी.
हेही वाचा -रेडा आणि म्हशीची प्रेमकहाणी 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' चा धमाल ट्रेलर प्रदर्शित!