महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Kartik Aaryan hugged His Ex Sara Ali Khan: 'गदर 2'च्या पार्टीत कार्तिकनं एक्स गर्लफ्रेंड साराला मारली मिठी , व्हिडिओ व्हायरल - सारा अली खान आणि कार्तिक आर्यन

Kartik Aaryan hugged His Ex Sara Ali Khan : सनी देओलचा 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. दरम्यान या चित्रपटाच्या यशानंतर एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार आले होते. मात्र सध्या सारा अली खान आणि कार्तिक आर्यनने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

Kartik Aaryan hugged His Ex Sara Ali Khan
कार्तिक आर्यनने एक्स गर्लफ्रेंड सारा अली खानला मिठी मारली

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 3:20 PM IST

मुंबई - Kartik Aaryan hugged His Ex Sara Ali Khan : सनी देओलचा 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. 'गदर 2' बॉक्स ऑफिसवर दररोज नवनवे रेकॉर्ड बनवत आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटानं आतापर्यत 500 कोटी रुपयांच्या जवळपास कमाई केली आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. याशिवाय या चित्रपटाची संपूर्ण टीम देखील खूप खूश आहे. दरम्यान आता सनी देओलने चित्रपटाचं यश पाहून मुंबईत 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीचं आयोजन केले होते. या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.

सारा आणि कार्तिकचा सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल :आता या पार्टीमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान या पार्टीमधला एक व्हिडिओ समोर आला आहे, यामध्ये सारा अली खान आणि कार्तिक आर्यन एकत्र दिसत आहे. या पार्टीमधून बाहेर पडताना सारा आणि कार्तिक मिठी मारताना दिसत आहेत. यावेळी कार्तिकसोबत क्रिती सेननही तिथे उपस्थित होती. सारानं क्रितीला देखील मिठी मारून निरोप घेतला. या पार्टीमध्ये सारासोबत तिचा भाऊ इब्राहिम अली खान देखील आला होता. साराच्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांच्या कमेंट येत आहेत.

चाहत्यांनी केल्या कमेंट : हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. सारा अली खान ही कार्तिक आर्यनची एक्स गर्लफ्रेंड होती. आता या जोडप्याचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना छान वाटत आहे. या व्हिडिओवर कमेंट करत एका चाहत्यानं म्हटलं, 'ही जोडी खूप खास दिसते' तर दुसऱ्या एका चाहत्यानं की, 'दोघेही सुंदर आहेत' असे म्हटलंय. अशा अनेक कमेंट या व्हिडिओवर येत आहेत. 'लव्ह आज कल'च्या शूटिंगदरम्यान सारा आणि कार्तिकच्या अफेअरच्या बातम्या येत होत्या. त्यानंतर काही दिवसांनंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याचे सांगण्यात आलं होते. तसेच सारा आणि कार्तिकनं ब्रेकअप झाल्यानंतर एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले होते. आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यात सर्व काही ठिक आहे, असे दिसत आहे.

हेही वाचा :

  1. Gadar २ VS OMG २ box office day २४ : 'गदर 2' आणि 'ओएमजी 2'; कोणाचे किती कलेक्शन? घ्या जाणून...
  2. Dream Girl 2 Box Office Collection day 10: आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे स्टारर 'ड्रीम गर्ल 2' करत आहे बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई...
  3. Gadar २ Success Party : 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीत दिग्गज बॉलिवूड कलाकारांची हजेरी; पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details