महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

पत्नीच्या मृत्यूनंतर 13 वर्षांनेही सावरला नाही राहुल देव, मुलाखती दरम्यान झाला भावूक - Rahul Dev wife Reena dev

2009 मध्ये राहुल देव यांनी पत्नी रीना देव यांना गमावले. पत्नीच्या निधनानंतर राहुल देव एकटे पडले आहेत. आता आपल्या एका मुलाखतीत पत्नीच्या मृत्यूबद्दल बोलताना राहुल भावूक झाला. आपल्या मुलाला एकट्याने वाढवणे किती कठीण आहे हे राहुलने सांगितले.

राहुल देव,
राहुल देव,

By

Published : Sep 20, 2022, 1:13 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता राहुल देवने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. राहुल आता लवकरच 'कब्जा' या कन्नड चित्रपटात दिसणार आहे. पडद्यावर आपल्या दमदार अभिनयाने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारा राहुल खऱ्या आयुष्यात मात्र दुःख आणि संकटातून जात आहे. राहुलने आता आपल्या मनाची स्थिती सांगितली आहे. 13 वर्षांनंतरही पत्नीच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या अभिनेत्याने मुलाला एकट्याने वाढवले याबद्दल भाष्य केले आहे.

पत्नीच्या निधनाबद्दल बोलताना अभिनेता बोलताना राहुल देव भावूक झाला. एकट्याने मुलाचे संगोपन करणे किती कठीण आहे याबद्दल त्याने सांगितले. 2009 मध्ये राहुल देवने पत्नी रीना देव यांना गमावले. पत्नीच्या निधनानंतर राहुल देव एकटे पडले आहेत.

कनेक्ट एफएम कॅनडाशी संवाद साधताना राहुल देव म्हणाला की, पालकत्व ही गोष्ट अजिबात सोपी नाही. मुलांच्या संगोपनात महिलांचा मोठा वाटा असतो. आई आपल्या मुलांना ज्या प्रकारे समजून घेते तसे कोणीही समजू शकत नाही. मुलांच्या बाबतीत स्त्रियांचा सजगपणा खूप वेगळ्या स्तराचा असतो. मी पण तसाच होण्याचा प्रयत्न करतो, पण कधी कधी माझा संयम हरवतो. मला आई आणि वडील दोन्ही व्हायचे आहे.

राहुल पुढे म्हणाला, मी जेव्हा मुलाच्या शाळेत पालक-शिक्षकांच्या बैठकीला जातो तेव्हा मला फक्त महिलाच दिसतात. त्यावेळी मला खूप असुरक्षितता वाटते. मुलांचे बाप कुठे आहेत असा प्रश्न पडतो.

राहुल म्हणाला, याचा खूप त्रास होतो. मला फारसे आठवायचेही नाही. ही गोष्ट चित्रपटांमध्ये सहज वाटते. अनेक वेळा चित्रपटांमध्ये दाखवले जाते की जोडीदार हरवलेला आहे. पण पुन्हा आयुष्याला सुरुवात करणे अजिबात सोपे नाही.

पत्नीच्या मृत्यूनंतर मुग्धासोबत डेट - पत्नीच्या निधनानंतर राहुलने देव मुग्धाला डेट केले आहे. राहुलने आपल्या जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, मुग्धाला डेट करताना त्याला आपल्या मुलाची काळजी वाटत असे. तो म्हणाला की जेव्हा त्याच्या मुलाला त्यांच्या नात्याबद्दल कळाले तेव्हा जगापासून लपवण्यासारखे त्यानंतर काहीही नव्हते.

राहुल देवबद्दल सांगायचे तर, त्याने मनोरंजन विश्वात 2 दशके पूर्ण केली आहेत. चॅम्पियन या अॅक्शन चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉलिवूडशिवाय राहुलने साऊथच्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

हेही वाचा -Un General Assembly: जग बदलण्याची आपल्या हाती विलक्षण संधी प्रियंका चोप्रा जोनास

ABOUT THE AUTHOR

...view details