महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Dharmendra-Esha : वडिलांच्या माफीनाम्यानंतर मुलगी ईशाचे हृदयस्पर्षी उत्तर

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये त्यांनी दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि दोन्ही मुलींची माफी मागितली आहे. धर्मेंद्र यांनी नुकतेच आपल्या नातवाच्या लग्नाला हजेरी लावल्यानंतर ही पोस्ट लिहिली आहे. दरम्यान वडिलांच्या पोस्टवर आता ईशा देओलने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

Dharmendra-Esha
धर्मेंद्र - ईशा

By

Published : Jun 29, 2023, 5:48 PM IST

मुंबई : हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या खूप चर्चेत आहेत. अलीकडेच त्यांचा नातू करण देओलचे लग्न झाले. तसेच या विवाहात ते देखील सहभागी झाले होते. धर्मेंद्रने नातवाच्या लग्नात फार डान्स केला आणि खूप एन्जॉय केला. या लग्नामधील डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच धर्मेंद्र सोशल मीडियावरही फार सक्रिय असतात आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही पोस्ट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता पुन्हा एकदा धर्मेंद्रच्या एका वैयक्तिक पोस्टने चाहत्यांचे डोळे पाणावले आहेत. यावेळी धर्मेंद्र यांनी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये धर्मेंद्र यांनी दुसरी पत्नी हेमा मालिनी आणि दोन्ही मुली ईशा आणि आहाना देओल यांना माफी मागितली आहे.

धर्मेंद्र यांची भावनिक पोस्ट :धर्मेंद्र यांनी मोठी मुलगी ईशा देओलसोबतचा फोटो शेअर करत लिहिले, ईशा, आहाना, हेमा आणि माझ्या सर्व प्रिय मुलांनो…… तख्तानी आणि वोहरा यांच्यावर मी प्रेम करतो आणि तुम्हा सर्वांचा मनापासून आदर करतो…… वय आणि आजारपण मला सांगत आहे की मी तुझ्याशी वैयक्तिकरित्या बोलू शकलो असतो... पण बोलू शकलो नाही... मला माफ करा'. (हात जोडलेला इमोजी)

वडिलांच्या पोस्टनंतर ईशाची पोस्ट : दरम्यान, धर्मेंद्रच्या पोस्टच्या 10 तासांनंतर, ईशाने तिच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, 'लव्ह यू पापा. तू सर्वोत्कृष्ट आहेस, मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तुला ते माहित आहे, आनंदी रहा आणि नेहमी आनंदी आणि निरोगी रहा, तुझ्यावर खूप प्रेम. असे तिने लिहले.

धर्मेंद्र यांनी माफी का मागितली? : धर्मेंद्रने आपल्या नातवाच्या लग्नाला आमंत्रण न दिल्यामुळे पत्नी, मुली आणि जावई यांची माफी मागितली आहे का? की खरच कामामुळे धर्मेंद्र त्यांच्याशी बोलू शकले नाही? धर्मेंद्रची पहिली पत्नी प्रकाश कौर हिचे दोन्ही मुले सनी आणि बॉबी देओलचे हेमा मालिनीसोबत जमत नाही त्यामुळे करणच्या लग्नातही हेमा मालिनीचे कुटुंबीय अनुपस्थित होते, दरम्यान धर्मेंद्र आपल्या दोन्ही कुटुंबांमध्ये संतुलन राखताना दिसत आहे.

हेही वाचा :

  1. SPKK MOVIE : प्रेक्षकांनी ट्विटरवर 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाला म्हटले ब्लॉकबस्टर
  2. SPKK Movie : 'सत्यप्रेम की कथा' आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित, 'भूल भुलैया 2' चा रेकॉर्ड तोडू शकेल ?
  3. Adipurush box office collection day 13 : बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष' कोसळला

ABOUT THE AUTHOR

...view details