महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 5, 2023, 3:53 PM IST

ETV Bharat / entertainment

Esha Deol wishes Amit Sadh : ईशा देओलने तिचा 'मैं' सहकलाकार स्टार अमित साधला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता अमित साध आज आपला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याचे अनेक चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. मैं या आगामी चित्रपटातील त्याची सहकलाकार ईशा देओलनेही त्याच्यासाठी शुभेच्छा पाठवल्या आहेत.

Esha Deol wishes Amit Sadh
अमित साधला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई - अभिनेता अमित साधच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री ईशा देओलने एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. ईशाने इंस्टाग्रामवर लिहिले की, वाढदिवसाच्या शुभेच्छा अमित. साहसी आणि उत्साही राहा. उत्तम आरोग्य आणि आनंदासाठी तुला शुभेच्छा. काम करण्यासाठी एक अप्रतिम सहकलाकार. प्रेक्षकांनी आम्हाला आमच्या मैं चित्रपटात पाहावं यासाठी जास्त प्रतीक्षा करू शकत नाही.

तिने शूटमधील एक बीटीएस फोटोदेखील शेअर केला आहे. यामध्ये अमित आणि ईशा हसताना दिसत असून त्याने तिच्यासाठी उन्ह लागू नये म्हणून डोक्यावर छत्री धरल्याचे दिसत आहे. हा फोठो पाहून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अनेकांना हा फोटो पाहून अमितला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताने ईशा प्रती दाखवलेल्या स्त्रीदाक्षिण्याचे अनेकजण कौतुक करत आहेत.

'मैं' चित्रपट हा एक कॉप ड्रामा आहे. एका शक्तिशाली संदेशासह सामाजिकदृष्ट्या प्रासंगिक असल्याचे म्हटले जाते.यापूर्वी अमित साधने 'ब्रीद' नेब सिरीजमधील अपारंपरिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्याच्या भूमिकेने सर्वांनाच थक्क करून सोडले होते आणि आता तो पुन्हा एकदा पोलिस म्हणून त्याच्या अभिनयाने त्याच्या चाहत्यांना प्रभावित करण्यास उत्सुक झाला आहे. नुकतेच त्याने चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग सुरू केले.इंस्टाग्रामवर अमितने चित्रपटातील त्याचा लूक शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'कामावर परत येत आहे!!! माझा आवडता व्यक्ती निखील नागझरकर याचे छायाचित्रण करत आहे.

चित्रपटाच्या सेटवर हा अभिनेता अमित साध बंदूक घेऊन पोज देताना दिसला होता. निळ्या रंगाचा डेनिम शर्ट आणि काळ्या जीन्स परिधान केलेल्या अमितने आपला स्वॅग दाखवला होता. अभिनेत्री ईशा देओलने अमितच्या या फोटोवर प्रतिक्रिया दिली होती. चाहत्यांनाही त्याचा हा लूक खूप पसंतीस उतरला होता. 'मैं'मध्ये सीमा बिस्वास, तिग्मांशू धुलिया आणि मिलिंद गुणाजी यांच्याही भूमिका आहेत. याचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन सराफ यांनी केले आहे.

ईशाच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना म्हणाली की, तिची भूमिका आयुष्यातील स्त्रियांच्या प्रगतीसाठी मदत करेल. 'चित्रपटातील माझी भूमिका स्त्रियांच्या जीवनातील वाढीस कारणीभूत ठरते. एक स्त्री अकल्पनीय गोष्ट साध्य करू शकते हा एक मजबूत परंतु साधा संदेश यातून दिला जाणार आहे. माझ्या पात्रात एक स्त्री स्वतःला कसे शोधते आणि जीवनात उत्कृष्टतेचे दर्शन घडवते', असे ईशाने यापूर्वी सांगितले होते.

हेही वाचा -Sulochana Latkar : लता मंगेशकर ते बिग बीने समर्थन देऊनही सुलोचना दीदींची 'ती' इच्छा राहिली अपूर्ण

ABOUT THE AUTHOR

...view details