मुंबई - Animal movie :नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अॅक्शन थ्रिलर 'अॅनिमल' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर जबरदस्त कमाई करत आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित 'अॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीर कपूर रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डिमरी, परिणीती चोप्रा, सौरभ शुक्ला, सौरभ सचदेवा सुरेश ओबेरॉय, आणि शक्ती कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. दरम्यान, या चित्रपटामधील बॉबी देओलची भूमिका सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये बॉबीनं खलनायकाची भूमिका साकारली आहे. आता अभिनेत्री ईशा देओलनं एक पोस्ट शेअर करून भाऊ बॉबी देओलचं कौतुक केलं आहे.
ईशा देओलनं केलं भाऊ बॉबी देओलचं कौतुक : ईशा देओलनं एक फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला आहे. या फोटोवर तिनं लिहिलं, 'उत्तम कामगिरी आणि यश भाऊ' हा चित्रपट पिता-पुत्र नातं आणि गुन्हेगारी अंडरवर्ल्डच्या पार्श्वभूमीवर आहे. 'अॅनिमल' चित्रपट 1 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं कमाईच्या जबरदस्त ओपनिंग केली आहे. या चित्रपटासोबत विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर' हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे. सध्या या दोन्ही चित्रपटाची टक्कर रुपेरी पडद्यावर पाहिला मिळत आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटानं देखील बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग केली आहे. दरम्यान 'अॅनिमल' चित्रपटाकडून बॉबीला खूप अपेक्षा आहेत. या चित्रपटानं खूप लवकर 129.80 कोटींचं लक्ष गाठलं आहे.