महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

ईशा देओल भरत तख्तानी होणार विभक्त ? पोस्ट व्हायरल - ईशा देओल भरत तख्तानी होणार विभक्त

Esha Deol Divorce Rumors : ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल पती भरत तख्तानीपासून घटस्फोट घेणार असल्याची बातमी आता सोशल मीडियावर पसरत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भरत पत्नी ईशाला फसवत असल्याचं सांगितलं गेलं आहे.

Esha Deol Divorce Rumors
ईशा देओलच्या घटस्फोटाची अफवा

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 17, 2024, 12:41 PM IST

मुंबई - Esha Deol Divorce Rumors :ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ईशा पती भरत तख्तानीपासून घटस्फोट घेणार असल्याचं समजत आहे. ईशाच्या घटस्फोटाबद्दल आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेडिटच्या (Reddit) एका यूजरनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ईशा आणि भरत एकमेकांपासून वेगळे होत असल्याचे संकेत दिले गेले आहेत. दरम्यान, ईशा आणि तिचा पती भरत पार्टी किंवा सार्वजनिक ठिकाणी आता एकत्र दिसत नाहीत.

ईशा देओल आणि भरत तख्तानीचा होणार घटस्फोट ? :यूजरनं या पोस्टमध्ये भरत आपल्या पत्नीची फसवणूक करत असल्याचा दावाही केला आहे. नवीन वर्षाच्या दिवशी बेंगळुरूमध्ये एका पार्टीत या यूजरनं भरतला पाहिलं होतं. तो त्याच्या एका कथित गर्लफ्रेंडसोबत होता. भरतची मैत्रीण बंगळुरूमध्येच राहते, असेही सांगण्यात आलं आहे. मात्र, या बातमीवर देओल कुटुंबातील कोणीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सोशल मीडियावर आता या यूजरच्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. एका यूजरनं या पोस्टवर लिहिलं , ''भरतला बघून असं वाटलं की तो त्याच्या कुटुंबावर आणि पत्नीवर खूप प्रेम करतो.' दुसऱ्याने लिहिलं, 'ईशाच्या बाबतीत असं काही घडू नये.' आणखी एकानं लिहिलं, ''ईशा चांगली आहे , त्यामुळे तिच्यासोबत भरत असं काही करणार नाही.'' अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत.

ईशानं 2012 मध्ये भरतशी केलं लग्न :ईशा देओलनं 29 जून 2012 रोजी भरत तख्तानीशी लग्न केलं. या जोडप्याचं लग्न इस्कॉन मंदिरात अत्यंत साधेपणानं पार पडलं होतं. लग्नाच्या पाच वर्षानंतर हे जोडपं मुलगी राध्याचे पालक झाले आणि त्यानंतर 2019 मध्ये ईशानं दुसरी मुलगी मिराया तख्तानीला जन्म दिला. ईशा देओल आणि भरत तख्तानी एकमेकांसोबतचे फोटो अनेकदा शेअर करत असतात. मात्र यावेळी भरत ईशा देओलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधून गायब होता. भरत हा हेमा मालिनी यांच्या वाढदिवसालाही दिसला नाही. त्यामुळे आता या भरत-ईशा या जोडप्याच्या घटस्फोटाबद्दल चर्चा होताना दिसत आहे.

हेही वाचा:

  1. पंकज त्रिपाठी स्टारर 'मैं अटल हूं'च्या दुसऱ्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद
  2. रामायण फेम कलाकार अरुण गोविल, सुनील लाहिरी आणि दीपिका चिखलियाचे अयोध्येत आगमन
  3. आलिया भट्टच्या मताशी दीपिका पदुकोण सहमत, '12th Fail' वर केला कौतुकाचा वर्षाव

ABOUT THE AUTHOR

...view details