मुंबई - 51st Emmy Awards 2023: एमी अवॉर्ड्स 2023 च्या विजेत्यांची घोषणा झाली आहे. टीव्ही क्वीन एकता कपूर आणि कॉमेडियन वीर दास या दोन सेलिब्रिटींनी आपल्या नावावर हा पुरस्कार मिळवून देशाचा गौरव वाढवला आहे. हा पुरस्कार पटकावण्याची हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकाराची पहिलीच वेळ आहे. आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्स हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. या अवॉर्ड शोचा सोहळा न्यूयॉर्कमध्ये झाला, जिथे जगभरातून अनेक कलाकार आले होते. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या दोन भारतीय वेब सीरीजला या पुरस्कारांमध्ये नामांकन मिळाले. पहिली शेफाली शाहीची सर्वोत्कृष्ट वेब सीरीज 'दिल्ली क्राइम 2' आणि दुसरी अभिनेता वीर दारची कॉमेडी स्पेशल 'वीर दास': लँडिंग'ला नामांकन मिळाले, मात्र शेफाली शाह सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या गटात पुरस्कार मिळवण्यापासून वंचित राहिली.
एमी अवॉर्ड एकता कपूरला मिळाला : टीव्ही क्वीन आणि चित्रपट निर्माती एकता कपूरला कला आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे. एकता कपूर हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेव भारतीय आहे, जिला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. एमी अवॉर्ड जिंकल्यानंतर एकता कपूर भावूक झाली. एमी अवॉर्डसह तिनं तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एकतानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहलं, 'इंडिया मी तुमच्या एमीला घरी आणत आहे'
वीरदास मिळाला एमी अवॉर्ड : अभिनेता वीर दासनेही एमी अवॉर्ड जिंकून इतिहास रचला आहे. त्याला 'वीर दास- लँडिंग'साठी युनिक कॉमेडी स्पेशल कॅटेगरीचा पुरस्कार मिळाला आहे. वीर दासनं हा पुरस्कार 'डेरी गर्ल्स - सीझन 3'सोबत शेअर केला आहे. चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर वीर दासचे अभिनंदन करत आहेत. वीर दासची 'वीर दास- लँडिंग' वेब सीरिज नेटफ्लिक्सवर पाहता येईल. या वेब सीरिजचं दिग्दर्शन वीरनं केलं आहे. 26 सप्टेंबर 2023 रोजी एमी पुरस्कारांसाठी नामांकनांची घोषणा करण्यात आली होती. यावेळी विविध श्रेणींमध्ये नामांकन जाहीर करण्यात आले होते.
विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट अभिनेता- मार्टिन फ्रीमन (रिस्पांडर)