महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Hum Toh Deewane song OUT : उर्वशी रौतेलासोबत एल्विश यादवचं पहिलं गाणं 'हम तो दिवाने' झालं प्रदर्शित ; व्हिडिओ पाहा... - हम तो दिवाने झालं रिलीज

Hum Toh Deewane song OUT : 'बिग बॉस ओटीटी 2' चा विजेता एल्विश यादवचं 'हम तो दिवाने' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला चाहते पसंत करत आहेत.

Hum Toh Deewane song OUT
हम तो दिवाने गाणं रिलीज

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 7:46 PM IST

मुंबई Hum Toh Deewane song OUT : 'बिग बॉस ओटीटी 2'चा विजेता एल्विश यादव शो जिंकल्यानंतर खूप व्यग्र झाला आहे. तो अनेक नवीन प्रोजेक्टवर काम करत आहे. उर्वशी रौतेलासोबत एल्विशचं नवीन गाणं 'हम तो दिवाने' रिलीज झालं आहे. हे गाणे रिलीज होताच इंटरनेटवर लोकप्रिय झालं आहे. या गाण्याला अवघ्या 3 तासात 2.5 दशलक्षपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे एक रोमँटिक गाणं आहे, ज्यामध्ये दोघांची जोडी खूप खास दाखविण्यात आली आहे. एल्विशचे चाहते या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. उर्वशी रौतेला आणि एल्विश यादवचं 'हम तो दिवाने' हे गाणं त्याचं संगीत रसिकांच्या मनावर सध्या राज्य करत आहे.

गाणं झालं प्रदर्शित :या गाण्याचे बोल आणि ही जोडी चाहत्यांना खूप आवडली आहे. पहिल्यांदाच चाहत्यांना त्यांची जोडी एकत्र पाहायला मिळाली आहे. शोची ट्रॉफी जिंकल्यानंतर एल्विश यादव हा सर्वत्र प्रसिद्ध झाला आहे. 'हम तो दिवाने' हे गाणं यासिर देसाईनं गायले आहे. या गाण्याला संगीत हे रजत नागपाल दिलं आहे. तसंच या गाण्याचे बोल हे राणा सोटल यांनी लिहिले आहेत. हे एक रोमँटिक गाणं आहे, ज्यामध्ये एल्विश आणि उर्वशीची प्रेमकथा दाखविण्यात आली आहे. एल्विशच्या लोकप्रियतेचा फायदा या गाण्यालाही झाला आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणं खूप चालत आहे.

एल्विशचा देसी लूक : एल्विश यादवची या गाण्यात हरियाणवी आणि देसी स्टाइल पाहायला मिळत आहे. याशिवाय उर्वशी रौतेला देखील देसी शैलीत आहे. हे गाणं प्रदर्शित होण्यापूर्वी उर्वशीनं एल्विशचं खूप कौतुक केलं होतं. त्यानंतर एल्विशनी देखील उर्वशीची पोस्ट शेअर करत तिला धन्यवाद म्हटलं होतं. एल्विशचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. एल्विशनं 'बिग बॉस ओटीटी 2'मध्ये वाइल्ड कार्डमध्ये एंट्री केली होती. त्यानंतर तो विजयी ठरला. बिग बॉसच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा एखादा स्पर्धक वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केल्यानंतर विजयी झाला.

हेही वाचा :

  1. Priyanka Chopra And Malti Marie : प्रियांका चोप्राची मुलगी मालती मेरीनं मित्रांसह केला एन्जॉय ; फोटो केले शेअर...
  2. Dhadkan 2 : 'धडकन'चा सीक्वल लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला; दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी दिली अपडेट...
  3. HBD Ayushmann Khurrana: 'ड्रीम गर्ल 2'मध्ये पूजा बनून आयुष्मान खुरानानं जिंकली लोकांची मनं; वाचा आजच्या या बर्थडे बॉयची रियल कहाणी..

ABOUT THE AUTHOR

...view details