मुंबई - मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री एलनाज नौरोजी देखील इराणमधील हिजाब आंदोलनात सामील झाली आहे. एलनाजने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, एलनाज बुरखा घातलेली दिसत आहे आणि कॅमेऱ्यासमोर तिचे सर्व कपडे हळूहळू उतरवते. एलनाजने हा व्हिडीओ शेअर करून महिलांशी संबंधित अधिकारांबद्दल भाष्य केले आहे.
बुरख्यातून बिकिनीमध्ये आली अभिनेत्री - एलनाज नौरोजीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती आपले कपडे काढताना दिसत आहे आणि शेवटी तिच्या अंगावर फक्त काळी बिकिनी उरते, पण शेवटी ती आपली ब्रा देखील काढून टाकते.
मी नग्नतेचा प्रचार करत नाही - व्हिडिओ शेअर करत एलनाजने लिहिले की, 'महिला, ती जगातील कोणत्याही भागाची असली तरी तिला तिच्या आवडीचे कपडे घालण्याचा अधिकार आहे. कोणी महिला किंवा पुरुष स्त्रीयांनी कोणते कपडे घालावेत याचा सल्ला देऊ शकत नाहीत.'
एलनाज पुढे म्हणाल्या, 'प्रत्येकाचे स्वतःचे मत असते, त्यांची स्वतःची धारणा असते आणि त्यांचा आदर करणे देखील आवश्यक आहे, लोकशाही म्हणजे निर्णय घेण्याची शक्ती, प्रत्येक स्त्रीला ती तिच्या अंगावर काय कपडे घालावेत हे ठरवण्याचा अधिकार असला पाहिजे, मी मी येथे नग्नतेचा प्रचार करत नाही, मी निवड स्वातंत्र्याचा प्रचार करत आहे.'