मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी कालचा दिवस खूपच आनंदाचा होता. कारण त्याच्या मराठी पदार्पणाचा चित्रपट वेडात मराठा वीर दौडले सात या चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. यातील त्याचा फर्स्ट लूक मंगळवारी लॉन्च करण्यात आला. यात तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहे. पण या व्हिडिओमधील एका त्रुटीमुळे अक्षयला खूप ट्रोल केले जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील अक्षय कुमार सिंहासनापासून दमदार पावले टाकत चालताना दिसतो. या फ्रेममध्ये झुंबरही दिसते. झुंबराच्यामध्ये विद्युत बल्ब स्पष्टपणे दिसतात. ट्रोलिंगमागील कारण म्हणजे बल्बचा शोध १६३० ते १६८० या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळानंतर लागला.