मुंबई - Ekta kapoor :बॉलिवूडची स्टार फिल्ममेकर एकता कपूर ही सध्या नाराज दिसत आहे. तिनं ट्विटरवर तिच्या 'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटाबद्दल ट्विट केले आहे. एकताचं हे ट्विट देखील आता चर्चेचा मुद्दा बनत आहे. सध्या एकताला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे. यामुळे एकतानं आपली नाराजी व्यक्त करत एक ट्विट एक्सवर केले आहे.
एकता कपूर ट्रोल्सवर चिडली : एकता कपूरनं ट्विटमध्ये लिहले, 'मी ट्विटरवर परत आले आहे, मी काही बोलण्यापूर्वी माझ्या टीमनं मला पुन्हा शांत केले आहे' 'थँक यू फॉर कमिंग'बद्दल खूप आवाज केला जात आहे. चुकीचा मुद्दा बाजूला ठेवू सकारात्मक दृष्टिकोनातून हा चित्रपट पहा. चित्रपटाच्या रिव्ह्यूनं माझ्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. विविध प्रकारची सामग्री ही आजच्या काळाची गरज आहे'. त्यानंतर तिनं पुढं लिहलं, 'हा एक वेडा चित्रपट आहे जो माझी क्रेझी पार्टनर रियासोबत बनवला गेला आहे'. याशिवाय तिनं यावेळी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी कौतुक केले आहे. एकता कपूरचा हा चित्रपट सोशल मीडियावर खूप ट्रोल झाला होता, त्यानंतर एकताने तिची नाराजी व्यक्त केली होती.