महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ekdam Kadak Movie : 'आपल्या रेशनकार्डवर तुझंच नाव असणार', 'एकदम कडक' टिझर प्रदर्शित - जयश्री सोनुने

'प्रेम बीम काय नाय बरं का' पासून ते 'प्रेम एकदम कडक हाय' पर्यंतचा प्रवास 'एकदम कडक' या चित्रपटात बघायला मिळणार आहे. चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यावर त्यातील हिरोने हिरॉईनला प्रपोज केले. 'आपल्या रेशनकार्डवर तुझंच नाव असणार' या डायलॉग मुळे तो सर्वत्र व्हायरल झाला आहे.

Ekdam Kadak Movie
एकदम कडक

By

Published : Nov 8, 2022, 5:37 PM IST

मुंबई:'प्रेम बीम काय नाय बरं का' पासून ते 'प्रेम एकदम कडक हाय' पर्यंतचा प्रवास 'एकदम कडक' या चित्रपटात बघायला मिळणार आहे. चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. त्यातील हिरोने हिरॉईनला प्रपोज केले. 'आपल्या रेशनकार्डवर तुझंच नाव असणार' या डायलॉग मुळे तो सर्वत्र व्हायरल झाला आहे. 'एकदम कडक' चित्रपटाचा टिझर सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. या टिझरने चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढवली असून येत्या 2 डिसेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

ज्येष्ठ कलाकारांचा प्रवासही दमदार:तरुण कलाकारांच्या जोडीसोबतच ज्येष्ठ कलाकारांचा प्रवासही दमदार आहे. हे टिझरमध्ये बघायला मिळते. 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत एकदम कडक चित्रपटातून अभिनेते माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज, चिन्मय संत तसेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार, भाग्यश्री मोटे, गायत्री जाधव, प्रांजली कंझारकर, जयश्री सोनुने रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहेत.

चित्रपटगृहात रिलीज होणार: 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा गणेश शिंदे यांनी पेलवली आहे. तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप याचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू स्व. नरेंद्र भिडे, पंकज पडघन, उमेश गवळी यांनी दिले आहे. तर गीतकार म्हणून मंगेश कांगणे आणि गणेश शिंदे यांनी बाजू सांभाळली आहे. तर चित्रपटातील इतर गाणी सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, उमेश गवळी, सौरभ साळुंखे, सायली पंकज यांनी सुरबद्ध केली आहेत. हा चित्रपट छायाचित्रकार बाबा लाड यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला असून चित्रपटाच्या संकलनाची बाजू आनंद कामत, संदीप जंगम आणि ओम साई फिल्म स्टुडिओ यांनी उत्तमरित्या पेलवली आहे. येत्या 2 डिसेंबरला 'एकदम कडक' चित्रपटगृहात रिलीज होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details