महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

"एक व्हिलन रिटर्न्स"ने भारतात पहिल्या दिवशी केली 7 कोटी रुपयांची कमाई - जॉन अब्रहम एक व्हिलन रिटर्न्स

मोहित सुरी दिग्दर्शित, "एक व्हिलन रिटर्न्स"ने भारतात एका दिवसात 7.05 कोटी रुपयांची कमाई बॉक्स ऑफिसवर केली आहे. जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर या दोन्ही अभिनेत्यांचे चित्रपट अलिकडे यशस्वी झालेले नाहीत. त्यामुळे या चित्रपटाच्या यशाकडे दोघेही डोळे लावून आहेत.

एक व्हिलन रिटर्न्स
एक व्हिलन रिटर्न्स

By

Published : Jul 30, 2022, 12:40 PM IST

मुंबई - जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर यांच्या भूमिका असलेल्या "एक व्हिलन रिटर्न्स" ने थिएटरमध्ये रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतात 7.05 कोटी रुपये कमावले आहेत. मोहित सुरी दिग्दर्शित अॅक्शन थ्रिलर हा त्याच नावाने 2014 मध्ये रिलीज झालेल्या चित्रपटाच्या मूळ चित्रपटाचा फॉलोअप आहे.

एका मीडिया स्टेटमेंटमध्ये चित्रपट निर्मिती कंपनी T-Series ने म्हटले आहे की, "'एक व्हिलन रिटर्न्स' ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करून भारतात पहिल्या दिवशी 7.05 कोटी रुपयांची प्रभावी कमाई केली." दिशा पटानी आणि तारा सुतारिया यांचाही समावेश असलेला हा चित्रपट एकता कपूरने तिच्या बालाजी टेलिफिल्म्स आणि भूषण कुमारच्या टी-सीरीजच्या बॅनरखाली तयार केला आहे.

असे असले तरी ही कमाई फार मोठी म्हणता येत नाही. ८० कोटीच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनला असून शंभर कोटीची कमाईची अपेक्षा निर्मात्यांना आहे. मात्र पहिल्या दिवसाचा आकडा पाहता हे लक्ष्य मोठे आव्हान ठरु शकते. जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर या दोन्ही अभिनेत्यांचे चित्रपट अलिकडे यशस्वी झालेले नाहीत. त्यामुळे या चित्रपटाच्या यशाकडे दोघेही डोळे लावून आहेत.

हेही वाचा -पॉप सिंगर शकीराला 8 वर्षांच्या तुरुंगवासाची होऊ शकते शिक्षा

ABOUT THE AUTHOR

...view details