मुंबई - कोविड-19 साथीच्या निर्बंधानंतर दोन वर्षांनी दुर्गा पूजा उत्सव संपूर्ण देशभर अतिशय उत्साहात साजरा होत आहे. अभिनेत्री काजोल या सणासुदीचा पुरेपूर आनंद घेताना दिसली. दरवर्षी, ती तिच्या कुटुंबाला आणि चुलत भाऊ अयान मुखर्जीच्या कुटुंबाला मुंबईत दुर्गा पूजा उत्सव आयोजित करण्यासाठी मदत करते. अष्टमीच्या दिवशी काजोल दुर्गा पूजा पंडालमध्ये चित्रपट उद्योगातील अनेक सदस्यांचे स्वागत करताना दिसली.
रणबीर कपूर, मौनी रॉयपासून जया बच्चनपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी पंडालमध्ये आपली उपस्थिती दर्शवली होती. अष्टमीच्या सेलिब्रेशनमधील काजोलचे अनेक फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर फिरत आहेत. सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या क्लिपपैकी एक म्हणजे काजोलने जया बच्चनला मास्क काढण्याबद्दल डिवचले.
जया बच्चनला दुर्गापूजेत मास्क न काढल्यामुळे काजोलने चिडवले क्लिपमध्ये काजोल जयाला, "मास्क उतारना पडेगा" असे सांगताना दिसत आहे आणि तिला तिचा चेहरा दाखवण्याची विनंती करत आहे. अखेरीस जयाने मास्क न लावता काजोलसोबत फोटोंसाठी पोझ दिली.
दुर्गा पूजा पंडालमध्ये बॉलिवूड सेलेब्रिटी या क्षणाने अनेक नेटिझन्सच्या गतकाळातील आठवणी जाग्या झाल्या, कारण त्यांना 'कभी खुशी कभी गम' ची आठवण झाली, ज्यामध्ये जया आणि काजोल सासू आणि सून या जोडीच्या भूमिकेत आहेत. "हाहाहाहा काजोल सर्वोत्कृष्ट आहे," असे एका सोशल मीडिया युजरने म्हटले आहे.
यावेळी काजोलची चुलत बहीण आणि अभिनेत्री राणी मुखर्जी देखील पंडालमध्ये उपस्थित होती. राणीने पिवळ्या सिल्कची साडी निवडली तर काजोल फुलांच्या साडीत सुंदर दिसत होती.
पाच दिवसांचा वार्षिक उत्सव मां दुर्गाला सन्मानित करतो आणि दैत्य राजा महिषासुरावर तिने मिलेला विजय साजरा केला जातो. म्हणूनच देवीला महिषासुर मर्दिनी म्हणूनही ओळखली जाते. या वर्षी, दुर्गापूजा उत्सव शनिवार, 1 ऑक्टोबर (महाषष्ठी) पासून सुरू झाला आणि बुधवारी, 5 ऑक्टोबर (विजयादशमी) रोजी संपेल.
हेही वाचा -Jivachi Hotiya Kahili: 'जिवाची होतिया काहिली' मालिकेत अभिनेता राज हंचनाळे दिसणार रावणाच्या भूमिकेत!