महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

डंकी विरुद्ध सालार: यूएस अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोण मारणार बाजी हे जाणून घ्या

शाहरुख खानच्या 'डंकी' आणि प्रभासच्या 'सालार'सह वर्षातील सर्वात मोठ्या बॉक्स ऑफिस संघर्षासाठी मैदान तयार झालं आहे. यूएसमध्ये दोन चित्रपटांसाठी आता अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे. कोणत्या चित्रपटानं कमाईत आघाडी घेतलीय हे जाणून घेण्यासाठी वाचा.

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 12, 2023, 3:07 PM IST

Dunki vs Salaar
डंकी विरुद्ध सालार

मुंबई - भारतीय चित्रपट आणि चित्रपट रसिकांसाठी डिसेंबर हा अतिशय मनोरंजक महिना ठरणार आहे. 'सॅम बहादूर' आणि 'हाय नन्ना' सारखे अनेक मनोरंजक चित्रपट रिलीज झाले असताना, 'अ‍ॅनिमल'ने भारत आणि यूएस या दोन्ही ठिकाणी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता, वर्षाच्या अखेरीस दोन मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत. दोन्ही चित्रपटाकडून बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कलेक्शनची अपेक्षा निर्मात्यांना आहे.

प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार: भाग 1' आणि राजकुमार हिराणी दिग्दर्शित 'डंकी' या दोन चित्रपटांची येत्या काही दिवसांत बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. 'केजीएफ' फ्रँचायझीच्या प्रचंड यशानंतर प्रशांत नीलचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. या वीकेंडला भारतात दोन्ही चित्रपटांच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात होईल, असा अंदाज असला तरी, यूएस बाजार सध्या स्पर्धेचे केंद्रबिंदू बनला आहे. तेथे, काही काळापासून अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरूवात झाली आहे आणि जसजशी रिलीजची तारीख जवळ येत आहे, तशी तिकीटांची मागणी वाढू लागली आहे.

'सालार'ला अ‍ॅडव्हान्स बुकिंग अगोदर सुरू केल्याचा फायदा असला तरी, शाहरुख खानच्या जन आवाहनाला कमी लेखता येणार नाही. 'सालार' 21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये झळकेल. आजपर्यंत, 'सालार'ची 347 ठिकाणांहून 1119 शोसाठी अंदाजे 22,000 तिकिटे विकली आहेत. या चित्रपटाने 593,657 डॉलर (अंदाजे रु. 4.94 कोटी) कमाई केली आहे.

तुलनात्मकदृष्ट्या, 'सालार' चित्रपटाच्या आदल्या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या 'डंकी'ने 328 ठिकाणांवरील 925 शोसाठी 6514 तिकिटांच्या विक्रीतून 90,292 डॉलर (सुमारे 75 लाख रुपये) जमवले आहेत. 'डंकी' चित्रपट अलिकडेच रिलीज झालेला 'वोंका', 'एक्वामॅन' आणि 'द लॉस्ट किंगडम' सारख्या ब्लॉकबस्टर्सशी स्पर्धा करू शकणार नाही, ही प्राथमिक चिंता असूनही, सालार चित्रपटाइतकेच स्क्रीन आणि शो 'डंकी'ने मिळवल्याचे दिसते. असे असले तरी, चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजने आगाऊ विक्री वाढवण्यास मदत केली असली तरी, सामान्य राजकुमार हिराणीच्या प्रॉडक्शनप्रमाणे चित्रपट लोकांचे लक्ष वेधून घेत नाही. मात्र, येत्या काही दिवसांत घटनाक्रम स्पष्ट होईल.

हेही वाचा -

  1. रजनीकांतच्या 73 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं धनुषसह सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
  2. सुपरस्टार रजनीकांतची शानदार कारकीर्द, 'जेलर'चे यश आणि व्यक्तिगत जीवनावर एक नजर
  3. रणदीप हुड्डा आणि लिन लैशरामच्या वेडिंग रिसेप्शनचे फोटो झाले व्हायरल

ABOUT THE AUTHOR

...view details