मुंबई - Dunki trailer X reactions: गेल्या वर्षी शाहरुख खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी त्यांचा पहिला एकत्रीत 'डंकी' या चित्रपटाची घोषणा केली होती. दोघांचेही चित्रपट आवडणारा मोठा प्रेक्षक वर्ग आहे. घोषणा झाल्यापासून चित्रपटाबद्दलच्या प्रत्येक अपडेट्सची दखल चाहत्यांनी घेतली आहे. अशा या बहुप्रतीक्षित चित्रपटाचा ट्रेलर अखेर मंगळवारी रिलीज झाला. सुरुवातीला टीझर, 'लुट पुट गया' गाणे आणि 'निकले थे कभी हम घर से' या गाण्याच्या व्हिडीओनंतर 'डंकी' ड्रॉप 4 हा चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. ट्रेलरनंतर एक्सवर भरपूर प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
'डंकी' ड्रॉप 4 मध्ये चित्रपटाच्या कथानकाचे पूर्वावलोकन देण्यात आले आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं शाहरुख खान आणि राजकुमार हिराणी हे 'संजू', 'पीके', '3 इडियट्स' आणि 'मुन्ना भाई' मालिका यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शक पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. त्यामुळे चर्चा तर होणारच. त्यामुळे नेटिझन्सनं या ट्रेलरचं स्वागत केलंय. एका चाहत्यानं लिहिलंय, "राजकुमार हिराणी कधीही निराश करत नाही. जेव्हा कंटेटचा किंग बॉलिवूड किंगला भेटतो."
दुसर्याने लिहिले: "मला नेहमीच आंधळा विश्वास होता की राजकुमार हिराणी जेव्हाही शाहरुख खानचा चित्रपट करतील तेव्हा तो सर्वोत्कृष्ट असेल. 'डंकी' ट्रेलरनं याला दुजोरा दिला आहे." एका युजरनं लिहिलंय की, "योगायोग पाहा, डंकी आणि पठाणच्या शेवटच्या वाक्यात 'जय हिंद' हा शब्द आहे. तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलायंस."