मुंबई - Dunki Success Party :बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान स्टारर वर्ष 2023 चा 'डंकी'चा डंका अजूनही बॉक्स ऑफिसवर वाजत आहे. या चित्रपटाला रिलीज होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर जगभरात प्रदर्शित झाला. 'डंकी'नं बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 400 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. शाहरुख खानचे लागोपाठ तीन चित्रपट हिट झाले आहेत. आता या चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल समोर आले आहेत. या फोटोंमध्ये शाहरुख खान अनिल ग्रोव्हर 'डंकी' चित्रपटाचा दिग्दर्शक राजकुमार हिराणी दिसत आहे.
'डंकी' चित्रपटाची सक्सेस पार्टी : बॉलिवूड अभिनेता सुनील ग्रोव्हरचा भाऊ अनिल ग्रोव्हरनं त्याच्या इंस्टाग्रामवर शाहरुख खान आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. अनिलनं या फोटोसोबत एक लांबलचक नोट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यानं शाहरुख खान आणि दिग्दर्शकासह सर्व स्टारकास्ट, चाहते आणि त्याच्या मित्रांचे आभार मानले आहेत. या फोटोमध्ये 'किंग खान'नं काळ्या रंगाचा शर्ट आणि क्रीम कलरची पॅन्ट घातली आहे. तर दुसरीकडे अनिलनं पांढऱ्या कुर्त्यासह निळ्या रंगाचा जीन्स परिधान केला आहे. याशिवाय राजकुमार हिराणी यांनी ग्रे शर्ट घातला आहे.