मुंबई - Dunki movie dialogue :अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या आगामी चित्रपट 'डंकी'साठी चर्चेत असून या चित्रपटाकडून त्याला खूप अपेक्षा आहेत. 'डंकी' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवण्यास सज्ज झाला आहे. 2023 हे वर्ष किंग खानसाठी खूप खास आहे. या वर्षामध्ये त्यानं बॅक टू बॅट दोन चित्रपट हिट दिले. शाहरुख खानचा 'पठाण' आणि 'जवान' या दोन्ही अॅक्शन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली. 'डंकी' हा चित्रपट 21 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'डंकी' चित्रपटातील चौथ 'बंदा' हे गाणं 18 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालं. हे गाणे लोकप्रिय पंजाबी गायक दिलतेज दोसांझ याने गायलं आहे.
शाहरुख खानचा डायलॉग :या गाण्याच्या शेवटी शाहरुख खानचा एक संवाद आहे, जो लोकांमध्ये देशभक्ती जागृत करण्यासोबतच समाजाला एक मोठा संदेशही देत आहे. शाहरुख खान लंडनच्या कोर्टात 'बंदा' या गाण्यात म्हणतोय, ''जज सर, मला माझ्या देशात कोणताही धोका नाही. माझा देश जसा आहे तसा माझा आहे. 'जय हिंद' इथे राहून मी माझ्या देशाला शिव्या देणार नाही''. शाहरुख खानचा हा डायलॉग सोशल मीडियावर आता सध्या खूप व्हायरल होत आहे. हा डायलॉग देशभक्तीची भावनाही निर्माण करणार आहे. आता अनेकजण हा किंग खानचा डायलॉग ऐकूण त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. काही वर्षांपूर्वी देशात असहिष्णुतेचा मुद्दा चांगलाच तापला होता. त्यावेळी हिंदूंना धोका असल्याची चर्चा ही जोरदार सुरू होती.